पुणे: पुण्यात सध्या दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन देखील गुन्हेगारील आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. मात्र ऐन दिवाळीच्या हंगामात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण रस्त्यावर दोघांनी बंदुकीच्या मदतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळीतील टिकल्या वाजवण्याचे पिस्तूल वापरुन ही दहशत पसरवण्याचा प्रयत्न दोघांनी केला. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दोन युवकांनी दिवाळीतील टिकल्या वाजवायची नकली पिस्तूल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याकहा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव पूल तर वारजे या दरम्यान ही घटना घडली आहे. दोघेही तरुण व्यवसायाने पेंटर असल्याचे समजते आहे. दुचाकीवरून जात असताना नकली पिस्तूल त्यांनी हवेत फिरवली. त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आता पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला
खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांची सराफी पेढी वडगाव शेरी भागात आहे. आठवड्यापूर्वी चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. दागिने खरेदीचा बहाणा चोरट्यांनी केला. पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. पेढीतील कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची मोजदाद करत असताना चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करत आहेत.
हेही वाचा: Pune Crime News: ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे दागिने केले लंपास
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.