Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘पोलिस अधिकारी आहे’ म्हणत धमकी; ऑनलाइन गेममधील मैत्रीचा इंजिनिअरला बसला फटका

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर शिखर सक्सेना यांच्या मृत्यूमागे ऑनलाइन गेममधील मैत्री आणि पैशांच्या व्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. धमक्या, बनावट पोलिस अधिकारी असल्याचा दावा आणि खोट्या अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 03:03 PM
Crime News: ‘पोलिस अधिकारी आहे’ म्हणत धमकी; ऑनलाइन गेममधील मैत्रीचा इंजिनिअरला बसला फटका

Crime News: ‘पोलिस अधिकारी आहे’ म्हणत धमकी; ऑनलाइन गेममधील मैत्रीचा इंजिनिअरला बसला फटका

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन गेममधून मैत्री; इंजिनिअरला धमक्या देऊन पैशांची मागणी
  • बनावट पोलिस अधिकारी असल्याचा दावा; खोट्या ड्रग्ज केसची धमकी
  • संशयिताचा शोध घेण्यासाठी खराडी पोलिसांचे पथक हरियाण्यात
मगरपट्ट्यात नोकरीला असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने खराडीतील एका सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. शिखर सक्सेना असे मृत इंजिनिअरचे नाव आहे. या प्रकरणात ऑनलाइन गेममधून झालेली मैत्री, त्यानंतर धमक्या देऊन पैशांची मागणी आणि बनावट पोलिस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या संशयिताचा संबंध समोर आला आहे. शिखरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी तपास सुरू केला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाण्यात रवाना झाले आहे.

इमारतीवरून उडी; उपचारांपूर्वीच मृत्यू

१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास शिखरने खराडीतील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शिखरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शिखरच्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग तसेच विविध खात्यांवर पैसे ट्रान्सफर केल्याचे स्क्रीनशॉट असल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. शिखरला काही व्यक्तींकडून धमक्या मिळत होत्या आणि धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?

ऑनलाइन गेममधून झाली मैत्री

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शिखर आणि संशयित व्यक्ती ऑनलाइन गेम खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यातून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर संशयिताने शिखरला कथितरीत्या धमकावण्यास सुरुवात केली. आपण हरियाणा पोलिसांमध्ये अधिकारी असल्याचा दावा संशयिताने केला होता. तसेच शिखरला अमली पदार्थांशी संबंधित खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली.

संशयिताचा शोध घेण्यासाठी पथक हरियाण्यात

खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखरने संशयिताला काही रक्कम हस्तांतरित केली होती. या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असून संशयिताच्या मोबाइल क्रमांकाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाण्यात गेले आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यामध्ये शिखर इमारतीच्या आत चालताना दिसत आहे. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंग परिसरात एका सुरक्षा रक्षकाला त्याचा मृतदेह आढळून आला. आता धमक्या, आर्थिक व्यवहार आणि संशयिताची भूमिका या सर्व बाबींच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिखर सक्सेना यांच्यासोबत काय घडले?

    Ans: १ ऑक्टोबर रोजी पहाटे खराडीतील सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारल्यानंतर ते गंभीर जखमी झाले. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • Que: शिखरला कोणाकडून धमक्या मिळत होत्या?

    Ans: ऑनलाइन गेममधून ओळख झालेल्या एका संशयित व्यक्तीने धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

  • Que: संशयिताने काय दावा केला होता?

    Ans: संशयिताने आपण हरियाणा पोलिसांमध्ये अधिकारी असल्याचा दावा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: Pune software engineer shikhar saxena death online game threat money extortion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Death Case
  • online games
  • Pune Crime live Updates

संबंधित बातम्या

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा
1

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या
2

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.