Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

घराच्या चौथ्या मजल्यावरून पडला की त्याआधी काही वेगळंच घडलं? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा दुबेच्या घरातील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या मृत्यूने नवं गूढ निर्माण झालं आहे. पोस्टमोर्टममध्ये शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा आढळल्याने मृत्यूपूर्वी त्यांना फरफटत नेले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 01:04 PM
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

Follow Us
Follow Us:
  • पोस्टमोर्टममध्ये शरीराच्या मागील बाजूस ९०% जखमा
  • मृत्यूच्या परिस्थितीचा पोलिसांकडून तज्ज्ञांकडून अभ्यास
  • श्रद्धा दुबेच्या घरी शिवाचा संशयास्पद मृत्यू
 

लखनऊ : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरात संशयास्पद अवस्थेत व्यावसायिकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवा शर्मा यांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीराच्या मागील बाजूस सुमारे ९० टक्के जखमा असल्याचे समोर आले आहे. या जखमांच्या स्वरूपावरून मृत्यूपूर्वी त्यांना फरफटत नेण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या अहवालाबाबत तज्ज्ञांचे मत घेतले जात असून, त्यानंतर मृत्यूची परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इन्फ्लुएन्सरच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळला

अलीगंजच्या कपूरथला येथील सेक्टर एफ परिसरात रंजना शर्मा यांचा व्यावसायिक मुलगा शिवा शर्मा हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता श्रद्धाच्या घरातून शिवा खाली पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाची आई रंजना शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, शिवाच्या अंगावर केवळ अंडरवेअर होते. त्याच्या जबड्यातून आणि नाकातून रक्तस्राव होत होता. तसेच पाय वाकलेल्या अवस्थेत होते. शरीरावर विविध जखमा आणि सिगारेटचे चटके दिल्याच्या खुणा असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

मागील बाजूच्या जखमांमुळे संशय वाढला

आता समोर आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये शरीराच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जखमांचे स्वरूप पाहता शिवाला मृत्यूपूर्वी फरफटत नेण्यात आले असावे, असा तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे. या निष्कर्षानंतर पोलिसांकडून पोस्टमोर्टम अहवालाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. मृत्यू नेमका कशा परिस्थितीत झाला, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. तपासाचा भाग म्हणून क्राइम सीन रिक्रिएशन करण्याचाही पोलिसांचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

श्रद्धा दुबेचा घटस्फोट झाल्याची माहिती

पोलिसांच्या तपासानुसार, श्रद्धा दुबे हिचा २०२२ मध्ये पतीपासून घटस्फोट झाला होता. तिचा मुलगा सध्या तिच्या माजी पतीसोबत राहत असल्याची माहिती आहे. श्रद्धाचे महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध यामुळे तिचा माजी पती तिच्याशी बोलण्यासही घाबरत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्रद्धा, तिचा ड्रायव्हर, बहीण आणि अन्य काही व्यक्ती दिसून आल्याची माहिती आहे. शिवाला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी श्रद्धा तेथे उपस्थित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

एक लाखांच्या मागणीचा आरोप

दरम्यान, शिवा शर्माकडून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्याला त्याचा विरोध केल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषभ आणि त्याच्या दहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. श्रद्धा दुबे हिला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असून ती मॉडेलिंग शोमध्येही सहभागी होत असल्याची माहिती आहे. शिवा शर्मा यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, घरातून पडण्याची घटना कशी घडली आणि शरीरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जखमा कशा झाल्या, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Shiva sharma death case postmortem 90 percent injuries shraddha dubey sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Death Case
  • Influencers
  • Lucknow
  • on social media

संबंधित बातम्या

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या
1

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
2

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
3

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके
4

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.