Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्मिता यांचा मृतदेह जंगलात आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल पती सचिन माने याला अटक केली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 10:50 AM
Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

Follow Us
Follow Us:
  • महिला हवालदार स्मिता माने दोन दिवसांपासून बेपत्ता
  • बिडवाडी-हुंबरणे जंगलात संशयास्पद अवस्थेत मृतदेह
  • पती सचिन माने याला पोलिसांकडून अखेर अटक
 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात स्मिता माने यांचे पती आणि स्वतः पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. या कारवाईमुळे पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपासून होत्या बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता माने मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचा शोध सुरू होता. अखेर बिडवाडी-हुंबरणे परिसरातील दाट जंगलात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पतीवर छळाचा आरोप

दरम्यान, स्मिता माने यांच्या बहिणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पती सचिन माने याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन हा स्मिता यांचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे किंवा त्यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास त्या दिशेनेही केला जात आहे.

हेही वाचा: Pune Crime: १३ तोळे सोने दिले, तरी छळ थांबेना; आयटी अभियंता विवाहितेचा मृत्यू

रात्री उशिरा पतीला अटक

प्राथमिक तपास आणि नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास सचिन माने याला अटक केली. सचिन याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक दिशा मिळणार असून, स्मिता माने यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sindhudurg smita mane death case husband sachin mane arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Crime Police
  • Death Case

संबंधित बातम्या

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
1

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
2

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके
3

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
4

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.