Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dattatray Gade : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन सापडलं

पुणे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षारक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 26, 2025 | 10:23 PM
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन सापडलं

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन सापडलं

Follow Us
Close
Follow Us:

पुणे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षारक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. घटनेचा तपास करताना पोलिसांना एक मोठी लीड मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे घटना घडल्यावर शिरुरला म्हणजे त्याच्या राहत्या घरी गेल्याची माहिती मिळाली असल्याचं समजत आहे.

दरम्यान, पोलीस आता दत्तात्रय गाडेचा मोबाईल ट्रेस करत आहेत. यात एक मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. आरोपीच्या मोबाईलवर आलेले कॉल आणि संपर्कतील व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत २० जणांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर आणि दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी लोकेशन बंद दाखवत असल्यामुळे पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे.

अजित पवार यांनी काय म्हणाले?
काल पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्‍या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. आरोपी अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसत आहेत. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.

Web Title: Pune swargate asselt case accused dattatreya gade last location in shirur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • Pune Crime
  • Pune Police
  • Swarget Police

संबंधित बातम्या

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी
1

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
2

तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला
3

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला

आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या, आणखी दोन गुन्हे दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
4

आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या, आणखी दोन गुन्हे दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.