
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईवडील घरखर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत, या कारणावरून दोन्ही मुलांना आपल्या आईवडिलांबद्दल राग होता. या रागाच्या भरात त्यांनी आईवडिलांचा काटा काढण्याचा थरारक निर्णय घेतला. घटनेच्या रात्री दोन्ही मुलांनी घरात प्रवेश करून आईवडिलांवर हल्ला चढवला. दोघांनात्यांनी ठार मारलं त्यांनतर मृतदेह घरातच ठेवून पळ काढला. दोन दिवसानंतर शेजाऱ्यांना कुलेल्या वासाने संशय आला आणि त्यांनी पोलिसांना खबर देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि या घटनेचा थरार सामोर आला.
सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या
मृतकाचे नाव महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी आहे. या दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या वाटली होती. मात्र म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या तपासात या मृत्यूमागे खुनाचा सुगावा लागला. पोलिसांनी तपासाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलं.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या प्रकरणातील पोलिसांनी महादेव कांबळे यांचे दोन मुले नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परिसरात संतापाची लाट पसरली आहे.