
Kalyan News, Ramesh Mhatre, Shiv Sena Leader, Doctor Assault Case
Ramesh Mhatre Arrest: शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक अटक करण्यात आल्याची माहिती आहे. कल्याण येथील शास्त्री नगर शासकीय रुग्णालयात एका महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी, रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यत आली आहे. म्हात्रे यांनी महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते.
त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही या कृत्याचा निषेध करत कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. रुग्णालयाच्या एनआयसीयू (NICU) वॉर्डमध्ये घडलेल्या या हिंसक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांनी मंगळवारी रात्री म्हात्रे आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांतर म्हात्रे यांना बुधवारी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव साळुंखे यांनी नवजात बाळाच्या नातेवाईकांना बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) पूर्ण भरलेला होता आणि बाळाला योग्य काळजीची गरज असल्याचे सांगून डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
यावरून महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत रमेश म्हात्रे यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या मिनिटात रमेश म्हात्रे त्यांच्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील व्हिडिओ फुटेज, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात म्हात्रे एका महिला डॉक्टरकडे मागून जाताना दिसत आहेत, त्यावेळी महिला डॉक्टरच्या हातात मोबाईल फोन होता. म्हात्रे यांनी अचानक मागून संबंधित महिला डॉक्टरवर हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या हातातून फोन खाली पडला. त्यानंतर म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपण काहीही चुकीचे केले नाही मी रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केली नाही.”
Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
पण जेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले त्यावेळी संबंधित महिला डॉक्टर त्यांची तक्रार ऐकत नसल्यामुळे, तिचा फोन हिसकावून घेण्यासाठी त्यांनी फक्त तिच्या हातावर मारले होते. ती आमच्याशी बोलत नव्हती. मी फक्त तिच्याकडून फोन काढून घेतला. मी तिच्या गालावर मारले नाही. ती माझ्या रुग्णाकडे लक्ष देत नव्हती.”
रमेश म्हात्रे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. ते कल्याण-डोंबिवली भागातील एक राजकीय नेते आहेत. या भागात त्यांना एक ज्येष्ठ नेते मानले जाते. म्हात्रे यांच्यावर तीन गुन्हेगारी खटले देखील दाखल आहेत. यामध्ये दंगल, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि धमकी देण्याच्या आरोपांचा समावेश आहे.