Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: Jeevansathi.com वर फसवणुकीचा जाळा! पोलिस असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवलं, अनेकांना लुटून महिलांवर अत्याचार

रत्नागिरीत वैभव नरकर नावाच्या युवकाने पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून विवाह संकेतस्थळांवरील महिलांची फसवणूक केली. एका महिलेसोबत अत्याचार करून लाखो रुपये उकळले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 18, 2025 | 11:17 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी: रत्नागिरीतून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरील महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीचे नाव वैभव नरकर असे आहे. तो मूळचा रत्नागिरीचा आहे. नरकर हा स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून भासवत होता. त्याने विवाह संकेतस्थळावरून महिलांना फसवले. एका महिलेसोबत बलात्कार केला आणि अनेकांकडून आर्थिक फसवणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला

कशी केली फसवणूक?

पोल्सीणच्या माहितीनुसार, वैभव नरकर याने सोशल मीडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेशातील फोटो वापरून बनावट फ्रोफाईल तयार केली. चेंबूर येथील ३३ वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने लैंगिक अत्याचा केले आहे. त्यानांतर तिच्याकडून एक स्कूटर,₹२.५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ₹३०,००० रोख उकळले.

याआधी सोलापूरच्या एका महिलेलाही अश्याच प्रकारे फसवले होते. “Jeevansathi.com” वरून त्या महिलेशी ओळख करून घेतली आणि लग्नासाठी घरी येण्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्या नातलगाचा अपघात झाल्याचे सांगून ₹६३,००० मागितले. पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलेला तो आधीच विवाहित असल्याचे समजले.

बेरोजगार युवकांना भासवले

त्याचबरोबर नरकरने स्वतःला मंत्रालयात मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे १००हुन अधिक बेरोजगार युवकांना भासवले. त्यांना पोलीस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. काहींना तर पोलीस गणवेश शिवून घेण्यास सांगितले. अनेक पीडितांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या
भीतीने तक्रार दाखल केली नाही.

जमिनीवर सुटल्यावर पुन्हा फसवणूक

वैभव नरकर याला रत्नागिरी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली होती. जमिनीवर सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणूक सुरु केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो सराईत फसवणूक करणारा’ असून, भावनिक आणि सामाजिक विश्वास संपादन करून लोकांची आर्थिक, मानसिक आणि लैंगिक पातळीवर फसवणूक करतो.

बनावट फ्रोफाइल तयार

आरोपी वैभव नारकर हा पकडले जाऊ नये यासाठी सोशल मीडियावर आणि विवाह संकेतस्थळांवर स्वतःचे पोलीस गणवेषातील फोटो वापरून बनावट प्रोफाईल तयार केली. याद्वारे लोकांना तो पोलीस असल्याचे भासवत असे आणि त्यांची फसवणूक करता होता.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांना तब्बल 50 लाखांना गंडा; नोकरीचे बनावट पत्र दिले अन् नंतर…

Web Title: Ratnagiri crime fraud network on jeevansathicom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला
1

Akola Crime: गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
2

छत्रपती संभाजीनगर हादरलं! वैयक्तिक वादातून एकाच कुटुंबाकडून तरुणावर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

Mumbai Crime: मुंबईत अभिनेत्रीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक; सायबर भामट्यांनी 6.5 लाख रुपये उकळले
3

Mumbai Crime: मुंबईत अभिनेत्रीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक; सायबर भामट्यांनी 6.5 लाख रुपये उकळले

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार
4

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.