Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्युटी पार्लरच्या बहाण्याने वारंवार अत्याचार, पतीसोबत पत्नी-भावाचाही सहभाग; भयंकर प्रकार उघड

ब्युटी पार्लरचे काम शिकवण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय तरुणीवर आरोपीने वारंवार अत्याचार केला. पत्नी व भावानेही साथ दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2026 | 01:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

माणुसकीला काळिमा फसवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला ब्युटी पार्लरचं काम शिकवण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा घृणास्पद प्रकार करणारा व्यक्ती ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेच्या पतीने केला आहे. या गुन्ह्यात स्वतः पत्नी आणि भाऊ देखील साथ देत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल करताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शरीफ खान आणि यास्मिन खान असं अटक केलेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मुख्य आरोपी शरीफ खानची पत्नी यास्मिन हिच्याकडे ब्युटी पार्लरचं काम शिकण्यासाठी जात होती. यामुळे तिचं आरोपीच्या घरी येणं- जाणं होतं. महिन्याभरापूर्वी जेव्हा ती यास्मिनच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेली, तेव्हा तिथे शरीफ खान एकटाच होता. त्याने संधी साधून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तिने आरडाओरडा केल्यावर तिला जीवे मारण्याची आणि समाजात बदनाम करण्याची धमकी दिली.

यास्मीननेच दबाव टाकला

पीडितेने हा प्रकार यास्मीनला सांगितला, तेव्हा यास्मीनने पतीला रोखण्याऐवजी पीडितेवरच दबाव टाकला. “कोणाला काही बोलू नकोस, नाहीतर बदनामी होईल,” असं सांगून ती स्वतः घराबाहेर पहारा देऊ लागली आणि शरीफ आतमध्ये तरुणीवर अत्याचार करायचा.

Chhatrapati Sambhajinagar: आंतरजातीय विवाहानंतर छळ; 5 लाखांसाठी विवाहितेला मारहाण, घराबाहेर हाकलले आणि…

दोघांसमोरच ओढलं खोलीत आणि…

शनिवारी दुपारी ४ वाजता शरीफाने पुन्हा एकदा बदनामीची भीती दाखवून तरुणीला घरी बोलावले. यावेळी तिथे त्याची पत्नी यास्मीन आणि भाऊ मुबीन उपस्थित होते. त्यांच्या देखतच शरीफने तिला खोलीत ओढलं. मात्र, यावेळी पीडितेने हिंमत दाखवून कडाडून विरोध केला. तिने आरोपीला जोरात धक्का दिल्याने तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

कुटुंबीयांना लागली कुणकुण

कुटुंबीयांनीच कुणकुण पीडितेच्या नातेवाईकांना लागताच तिची आई, वडील, भाऊ आणि काका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. कुटुंबीयांना पाहताच आरोपी शरीफ खान पळू लागला, यादरम्यान त्याला दुखापतही झाली.

आरोपी अटकेत

पीडितेने तक्रारी दाखल केली. पीडितेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नी आणि भावासह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास केला जात आहे.

Sindhudurg Crime: जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने तरुणीला कसे जाळ्यात ओढले?

    Ans: ब्युटी पार्लरचे काम शिकवण्याच्या बहाण्याने बोलावून.

  • Que: गुन्ह्यात कोणाचा सहभाग होता?

    Ans: मुख्य आरोपीसोबत त्याची पत्नी आणि भाऊही सहभागी होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रार मिळताच तिघा आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Repeated sexual abuse under the pretext of beauty parlor visits wife and brother in law also complicit alongside husbandhorrific incident exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

भाजी कापल्याप्रमाणे केले प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे, डोकं ठेवलं फ्रिजमध्ये अन्….माणुसकीला काळीमा फासणारी घटना
1

भाजी कापल्याप्रमाणे केले प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे, डोकं ठेवलं फ्रिजमध्ये अन्….माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar: आंतरजातीय विवाहानंतर छळ; 5 लाखांसाठी विवाहितेला मारहाण, घराबाहेर हाकलले आणि…
2

Chhatrapati Sambhajinagar: आंतरजातीय विवाहानंतर छळ; 5 लाखांसाठी विवाहितेला मारहाण, घराबाहेर हाकलले आणि…

Sindhudurg Crime: जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत
3

Sindhudurg Crime: जमिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत
4

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.