काय घडलं नेमकं?
ओवलीये येथील सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरु होता. शनिवारी सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथसोबत घराशेजारील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे शेजारी राहणारे विजय कृष्णा सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत हे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली.
Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?
कोयत्याने डोक्यावर वार
सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या विजय आणि रघुनाथ या पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर भीषण वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, सरस्वती या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हे बघून एकनाथ सावंत हा हादरून गेला.
पोलिसांना संपर्क आणि…
त्याने तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधले आणि घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरस्वती सावंत यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
आरोपी अटकेत
या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपी विजय कृष्णा सावंत आणि रघुनाथ विजय सावंत या पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे.
Ans: जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे हल्ला करण्यात आला.
Ans: आरोपी पिता-पुत्राला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.






