ऑनलाइन घेतलेले कर्ज एजंटनेच केले लंपास
पुणे : भारतीय रेल्वेमध्ये टीसी असल्याची बतावणी केली. तसेच पती बीएसएफमध्ये असल्याचे खोटे सांगत महिलेने एका भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास गंडविले आहे. यात भारतीय रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून देताय? मग सावधान; पोलीस ॲक्शन मोडमध्ये, मालकांवर थेट…
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश नाईक हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून, सध्या ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. हा सगळा प्रकार 2022 मध्ये घडला. सुरेश नाईक यांना 2022 मध्ये एक फोन आला. ज्यामध्ये संजीवनी पाटणे यांनी त्यांच्या घरातील काम आहे, असं सांगितलं. त्यानुसार, नाईक हे त्यांच्या घरी इलेक्ट्रिक काम करायला गेले. यावेळी पाटणे यांनी आपण भारतीय रेल्वे विभागात टीसी आहोत असे सांगितले.
नोकरी लावून देण्यासाठी घेतले 17 लाख रुपये
भारतीय लष्कर दलाच्या बीएसएफ तुकडीमध्ये असल्याचे सांगितले. यामुळे तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावायची असेल तर सांगा पण पैसे भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार, सुरेश नाईक यांनी त्यांची भाची आणि पुतणीसाठी नोकरी लावून देण्याबाबत महिलेला सांगितलं. यासाठी पाटणेने त्यांच्याकडून वेळोवेळी विविध रक्कम काढून घेतली. पाटणे आणि तिच्या साथीदाराने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण 17 लाख रुपये उकळले.
दोघांचा शोध सुरू
नाईक यांनी महिलेला 17 लाख रक्कम दिल्यानंतर वारंवार नोकरी कधी लागणार याबाबत विचारणा केली. मात्र, पैसे घेऊन नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश नाईक यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सुरेश नाईक यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या संजीवनी पाटणे आणि शुभम मोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे.
हेदेखील वाचा : Satish Pradhan : शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं निधन; शिवसेनेच्या जडणघडणीत बजावलीय मोठी भूमिका