Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा भाऊ न सापडल्याने लहान भावावर सूड; पूर्ववैमनस्यातून 19 वर्षीय तरुणाची अपहरण करून निर्घृण हत्या

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी त्याच्याच भावाला अमानुषपणे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 11:36 AM
crime, (फोटो सौजन्य- pinterest)

crime, (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी त्याच्याच भावाला अमानुषपणे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी अपहरण केलं नंतर लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली. मृत तरुणाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

फोटो दाखवून शैक्षणिक नुकसानाची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीला कॉलेजच्या गोडाऊनमध्ये नेलं अन्…..

अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता) येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून सहा तरुणांनी त्याच्याच भावाचं अपहरण करून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून अनंत सिन्नर- शिर्डी महामार्गावर सामाजिक वाणीकरांजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून देण्यात आला. सोमवारी (दि.14) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?
शनिवारी (दि. १२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटलच्या समोरून प्रतीक वसंत सदाफळ (वय 19 वर्षे) याचा अपहरण करण्यात आले होते. त्याला आरोपींनी सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये टाकून नेलं होतं, नंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून देण्यात आला होता. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरणाऱ्यास रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिस पाटलांना याबाबतची माहिती दिली आणि या घटनेची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली.

याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी रितेश सदाफळ याच्या फिर्यादीहून संशयित प्रशांत ऊर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळीविहीर ता. राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा. सावळीविहीर ता. राहाता) या सहा संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांचा प्लॅन
मृताचा भाऊ रितेश सदाफळ (वय 22) आणि संशयित सहा जण आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते. हे सहाही जण रितेशच्या मागावर होते. त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप आपल्या समोर येईल, तिथेच त्याचा गेम करायचा असा संशयितांचा ‘प्लॅन’ होता. मात्र, रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही, परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी रितेशचा भाऊ प्रतीकला अमानुषपणे मारहाण करत संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Revenge on younger brother as elder brother not found 19 year old youth kidnapped and brutally murdered due to past enmity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Crime . Crime News
  • Murder News

संबंधित बातम्या

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
1

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके
2

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.