crime (फोटो सौजन्य: social media )
बुलढाणा: मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटल्याचे सामोर आले आहे. पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार झाल्याचे समोर आले आहे. शेषमलजी जैन असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल (22 ऑगस्ट) सायंकाळी खामगाव येथे घडली आहे. नेमकं काय घडलं?
Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
नेमकं काय घडलं?
मुंबईतील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापारासाठी आले होते. काल (22 ऑगस्ट) सायंकाळी ते खामगाव येथून मुंबईकडे जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहन चालकाने कार थांबवून…मला फ्रेश व्हायचं…, असं म्हणत समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. त्यानंतर लगेचच मागून एका चार चाकी वाहनाने आलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या शेषमलजी जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या कारमधील साडेचार ते पावणे पाच किलो सोने असलेली बॅग व रोकड घेऊन हे दरोडेखोर फरार झाले.
त्यांचा कारचालक सुद्धा दरोडेखोरांच्या वाहनात बसून फरार झाला. तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली असता दरोडेखोरांची कार ही अकोला जिल्ह्यातील पातुर जवळ आढळली. मात्र दरोडेखोर हे पसार झाले होते. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अलीकडेच समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी झालं असलं तरी मात्र वाहनांवर दगडफेक वाहन लुटीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे.
मुंबईतील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल; पोलिसांकडून कसून तपासणी सुरु
मुंबईतील गिरगाव येथील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मंदिर व्यवस्थापनाला ईमेलची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशन आणि बॉम्ब पथकाला कळवले. माहिती मिळताच, पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळली नाही.
इस्कॉन मंदिराच्या अधिकृत ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल आला होता. सध्या मुंबईचे गावदेवी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे.
गुरुवारी मुंबईतील एका हॉटेलला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी येथील फोर सीझन्स हॉटेलला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला होता. हॉटेल प्रशासनाने तात्काळ मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला या ईमेलची माहिती दिली. या ईमेलमध्ये तामिळनाडू पोलिसांसाठी एक संघ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. ‘फोर सीझन’, मुंबई (हॉटेल) च्या ३ व्हीआयपी खोल्यांचा उल्लेख करून स्फोटांच्या धमक्या देण्यात आल्या.