Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याच्या बंगल्यावर दरोडा, कुटुंबियांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण; तब्बल 12 लाख लुटले

दरोडेखोरांनी दवंगे यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड, पत्नी अनिता यांचे सोन्याचे दागिने, मुलगा आकाश याचे चांदीचे ब्रेसलेट आणि बहीण लंकाबाई यांचे सोन्याचे दागिने लुटले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 12:18 PM
शेतकऱ्याच्या बंगल्यावर दरोडा, कुटुंबियांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण; तब्बल 12 लाख लुटले

शेतकऱ्याच्या बंगल्यावर दरोडा, कुटुंबियांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण; तब्बल 12 लाख लुटले

Follow Us
Follow Us:

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द परिसरात शेतवस्तीवरील बंगल्याला लक्ष्य करत चार अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास किचनचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी शेतकरी राजेंद्र सिताराम दवंगे (वय ५५) यांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून कुटुंबीयांना धमकावत ५० हजार रुपयांची रोकड आणि ११ लाख ४७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ११ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी जवळच्या दुसऱ्या वस्तीवरही चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राजेंद्र दवंगे यांची जवळके रस्त्यावरील वारेगाव परिसरात दवंगे वस्ती येथे वस्ती आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या आणि अंगाने सडपातळ असलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या बंगल्याच्या किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दवंगे यांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवत घरातील सदस्यांना गप्प राहण्यास भाग पाडले.

गळ्यातील दागिनेही बळजबरीने काढले

दरोडेखोरांनी दवंगे यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड, पत्नी अनिता यांचे सोन्याचे दागिने, मुलगा आकाश याचे चांदीचे ब्रेसलेट आणि बहीण लंकाबाई यांचे सोन्याचे दागिने लुटले. हॉलमध्ये झोपलेल्या अनिता, मुलगी अंकिता आणि लंकाबाई यांच्या गळ्यातील दागिनेही बळजबरीने काढून घेतले. अंकिता धनवटे हिच्या गळ्यातील सोन्याची पोत कापून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरोडेखोरांनी सोन्याच्या पोती, मण्यांची पोत, अंगठ्या, कानातील झुबे, डोरले आणि चांदीचे ब्रेसलेट यांसह एकूण ११ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर चौघांनी जवळच्या उसाच्या शेतात धूम ठोकली.

शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोरांची दहशत

शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी घरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. भरवस्तीजवळील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याने शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Meera-Bhaindar News : मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांकडून नागरिक अन् पत्रकारांना मारहाण: नेमकं घडलं काय?

Web Title: Robbery at a farmer bungalow 12 lakh rupees looted incident in sinnar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 12:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.