पुणे: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी माझ्या अकाऊंटवर १० लाख रुपये जमा करण्यात आले होते. मला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते. परळीतील राखेच्या सेंटर परिसरात आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. त्याठिकाणी वाल्मिक कराड मला स्वत:भेटायला आले होते. लोकसभा निवडणुकीवेळी मी बोगस मतदान करू दिले नव्हते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील परळीच्या मतदानावेळी मला इव्हीएम मशीन आणि मतदान कक्षापासून दूर राहण्यासाठी हे १० लाख रुपये माझ्या अकाऊंटवर पाठवण्यात आले होते, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्यांमुळे आता परळीतील आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे.
आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून रणजित कासले यांना अटक करण्यात आली. पण त्यापूर्वीच पुणे विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी बीडमधील गुन्हेगारीसंदर्भात मोठमोठे खुलासे केले आहेत. तुमच्या सोबत आणखी कुणा-कुणाच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले, असा प्रश्न विचारला असता, कासले म्हणाले, माझ्यासोबत सचिन पांडकर हेसुधा आहेत. पांडकर मला म्हणाले होते की पैसे आलेत ते भेटत असतात, ते तुमच्याकडेच ठेवा ओपन करू नका, नाहीतर तेही जातील आणि संस्पेंडही व्हाल. बीडमधील अॅडिशनल एसी आहेत जे गेल्या चार वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत, ते वाल्मिक कराडचे हस्तकही आहेत.
बोगस एन्काऊंटर काय असते हे मी आधीही सांगितलं आहे. तुम्हालाही माहिती आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृहसचिव यांची केंद्र सरकारकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते. त्यानंतर वरिष्ठ स्तरावरील चार-पाच अधिकारी एकत्र येतात, ते अधिकारी आणखी विश्वास अंलमदार निवडतात आणि संबंधित आरोपीचा बोगस एन्काऊंटर केला जातो. तीच ऑफर मला होती. त्याचे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण आयएएस, आयपीएस खूप हुशार असतात. बंद दाराआड त्यांच्या चर्चा होतात. जर तुम्हाला तुमच्या सेवेत १०-१५ करोड मिळणार असतील, तर बोगस एन्काऊंटर साठी तुम्हाला आताच ५० करोडची ऑफर दिली जाते. जर चौकशी लागलीच तर सरकार आमचचं आहे. त्यातूनही आम्ही तुम्हाल निर्दोष मुक्त करू, असं सांगितलं जातं.
वादाच्या भोवऱ्यात पुन्हा अडकला ‘Jaat’, सनी देओलच्या चित्रपटावर एफआयआर दाखल!
रणजित कासले म्हणाले, ‘ बीड पोलीस अधिक्षकांना अर्ज करा, तुम्हाला कंट्रोलची डायरी मिळून जाईल. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर चार दिवसातच अधिकारी आले होते. ते कोण होते, हे जाणून घ्यायचं असेल तर माहिती अधिकाराचा अर्ज टाका, तुम्हाला कळून जाईल, आता काल माझ्या घरात कोणते लोक घुसले होते. तेही विचारा, माझ्याही घरात पुरावे आहेत. चोरी, घरफोडी झाली आहे. माझ्या घरात. मी मीडियासमोरच घरात जाणार.
माझ्या घरात खूप काही कागदपत्र आहेत, बीडमधील जीएसटी भवनासमोर माझं घर आहे. माझ्या घरावर सस्पेंडची नोटीस लावली आहे. लॉक तोडलं. काल मला एकाचा कॉल आला होता. त्याने मला घरफोडी झाल्याचं सांगितलं आहे. मी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडचे जे कारनामे उघड करणार होतो, तेच पुरावे कागदपत्रे घरात होती. माझ्या घरासमोरच सीसीटिव्ही आहेत, ते तुम्ही चेक करा. तुम्हाला नक्कीच पुरावे सापडतील.’
दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या, मग मी किती वादग्रस्त असेल, मी स्वत;हून एकही विनंती अर्ज केला नव्हता, माझ्यातील हिंमत बघून माझी या एन्काऊंटर साठी निवड करण्यात आली असावी, पोलिस खात्यात अनेक डॅशिंग अधिकारी असतात, पण प्रत्येकजण समोर येत नाही. काही शांतही राहतात. मी एन्काऊंटर साठी नकार दिला, हे पाप करण्यास नकार दिला, म्हणून आज माझ्यावर ही वेळ आली.
मी सस्पेंड झालो म्हणून बोलतोय आधी बोललो असतो तरीही उपासमारीची वेळ आली असती, आताही उपासमारीचीच वेळ आली आहे, म्हणून बोलतोय. सरळ सरळ उत्तर आहे. आता मला खात्यातूनच डिसमिस करतील. मला माझे सहकारी मुकेश नहाटा यांचा फोन येत आहे. निखील गुप्तांचं चुकलं. पण आता देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची नावे मध्ये घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल, अजित पवारांचं नाव का घेतलं, ते म्हणले होते, अशा लोकांना म्हणजे पोलिसांना टायरमध्ये घालून मारलं पाहिजे, म्हणजे आमचे पोलिस बांधवांवर गुन्हे दाखल होऊदे, त्यांच्यावर ३०२ लागू द्या, असं ते बोलले होते त्यावरून मी बोललो.