Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची ६ तास ‘एसआयटी’ चौकशी; अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

Rupali Chakankar : माझे आणि अशोक खरात यांचे कोणतेही आर्थिक संबंध नव्हते. तसेच खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केलेला नाही, असेही त्यांनी चौकशीत नमूद केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2026 | 10:51 AM
Rupali Chakankar, Ashok Kharat Case, SIT Inquiry, Tejaswi Satpute,

Rupali Chakankar, Ashok Kharat Case, SIT Inquiry, Tejaswi Satpute,

Follow Us
Close
Follow Us:
  • एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रविवारी (१० मे) रुपाली चाकणकर यांची सुमारे सहा तास चौकशी केली
  • एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार- रुपाली चाकणकर
  • अशोक खरात यांची दुसरी बाजू किंवा त्यांच्यावरील आरोपांची माहिती मला नव्हती – रुपाली चाकणकर
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर चाकणकर यांना सर्वात पहिला फटका बसला तो त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला. पण त्यानंतरही त्यांच्या अडचणी वाढतच चालल्याचे दिसत आहे.

या घडामोडींनंतर आता त्यांच्या चौकशीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. अशातच रविवारी (10 मे) एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशोक खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या ..

दरम्यान,यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. अशोक खरातने पतसंस्थेत उघडलेल्या कथित बोगस खात्यांच्या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एसआयटी चौकशीदरम्यान त्यांनी नेमकी कोणती माहिती दिली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

“आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले”; एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकरांची भूमिका स्पष्ट

रुपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीत आपली भूमिका स्पष्ट करताना, माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून आध्यात्मिक श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरू मानले होते, असे सांगितले. माझे आणि अशोक खरात यांचे कोणतेही आर्थिक संबंध नव्हते. तसेच खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केलेला नाही, असेही त्यांनी चौकशीत नमूद केले.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

यावेळी अशोक खरात यांची दुसरी बाजू किंवा त्यांच्यावरील आरोपांची माहिती मला नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकर यांनी एसआयटीसमोर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी, “चौकशीत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरं दिली आहेत. माझ्या उत्तरांमुळे तपास यंत्रणेचं समाधान झालं असेल, असा मला विश्वास आहे,” असे सांगितले.

तसेच, “पोलिसांना तपासात जसं सहकार्य अपेक्षित असेल, तसं पूर्ण सहकार्य मी करणार आहे. तपासासंदर्भात सविस्तर चर्चा तपास यंत्रणेसोबत झाली असून, चौकशीचा अहवाल पुढे समोर येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Rupali chakankar questioned by sit for 6 hours in the ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • rupali chakankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.