Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया

ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 08, 2026 | 10:03 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:
  • लॉकरमधून १.१० कोटींचे सोने, १.८९ लाखांची चांदी आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स जप्त
  • पुणे, नाशिक, शिर्डी आणि सोलापूर येथील बंगले, लॉन आणि शेतजमिनीची तब्बल ९० कागदपत्रे तपास यंत्रणेच्या हाती
  • गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली एक मर्सिडीज कार देखील जप्त
Nashik Ashok Kharat Case Update: एका मोठ्या कारवाईत ईडीने नाशिक सेक्स स्कँडलमध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरात या भोंदू तांत्रिकाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तपास यंत्रणेने नाशिकमधील एका सहकारी बँकेतील अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त खात्यातील लॉकरमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. खरात दाम्पत्याच्या मुलीच्या उपस्थितीत, इंडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉडिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मौल्यवान वस्तू जप्त केल्या.

कथित गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नापोटी १.१० कोटींचे सोन्याचे दागिने, ५,५०० डॉलर्स (सध्याच्या दरानुसार ५.१९ लाख) रोख रक्कम आणि १.८९ लाख रुपयांचे चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये नाशिकमधील विश्वास सहकारी बँकेच्या मुंबई नाका शाखेत खरातचा लॉकर सील करण्यात आला होता. या कालावधीत तपास यंत्रणेने नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील खरात, त्याचे नातेवाईक आणि साथीदारांशी संबंधित अनेक ठिकाणी शोध घेतला. खरातच्या बँकेतील अंदाजे २.४ कोटी गोठवण्यात आले आणि ४२ लाखांची रोख जप्त करण्यात आली.

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

९० मालमत्तांची कागदपत्रे जप्त

याव्यतिरिक्त, अंदाजे ९० मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज आहे.

जप्त केलेल्या वस्तूमध्ये सोन्याचे नेकलेस सेंट, चेन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, गणेश मूर्ती, चांदीचे पैजण आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

ईडीने खरातची एक मर्सिडीज लक्झरी कारही जप्त केली. तपासादरम्यान, पुणे, नाशिक, शिडीं आणि सोलापूर येथील खरातच्या नावावरील मालमत्ताशी संबंधित ७० ते ८० कागदपत्रेही सापडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कागदपत्रांमध्ये बंगले, वेडिंग लॉन्स, शेतजमीन आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश होता.

Ashok Kharat Case : अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले …

वेगवेगळ्या लोकांच्या नावावर उघडलेली खाती

ईडीच्या तपासात अशोक खरातने केलेल्या एका मोठ्या फसवणुकीचाही खुलासा झाला आहे. सूत्रांनुसार, खरातने नाशिकमधील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये डझनभर बँक खाती उघडली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही सर्व खाती त्याच्या नावावर नसून विविध तिसऱ्या व्यक्तींच्या नावावर होती. मात्र, अशोक खरातने या सर्व बेनामी खात्यांमध्ये स्वतःला नॉमिनी म्हणून नियुक्त केले होते, ज्यामुळे बँकेत जमा झालेल्या निधीवर त्याचे पूर्ण नियंत्रण सुनिश्चित झाले होते. एजन्सीला संशय आहे की, फसवणुकीतून कमावलेले कोट्यवधी रुपये अशा प्रकारे विविध खात्यांमध्ये खर्च करण्यात आले आहेत.

ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, खरातचे काही इतर जवळचे सहकारी आणि त्याला बेनामी खाती उघडण्यास मदत करणारे इतर उच्चभ्रू व्यक्ती देखील या प्रकरणात सामील असू शकतात. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे आणि अटक होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Eds massive crackdown on ashok kharats illegal wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • ED Action
  • Money Laundering
  • Nashik News

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
1

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.