संग्रहित फोटो
गोपनीय माहितीवरून धाब्यासमोर सापळा
चारगाव फाटा परिसरातील हायवे पॉइंट धाब्यासमोर २ व्यक्ती गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती साकोली पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी पथक तैनात केले. संशयित दोघे तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे जप्त गांजाचा पुरवठा नेमका कोठून झाला, तो कोणाला विक्रीसाठी नेला जात होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून अपेक्षीत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी आणि साकोलीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या जोतिका इंगळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
Ans: साकोली पोलिसांनी दोन ट्रॉली बॅगमधून १२ किलो ६५६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची किंमत ६ लाख ३२ हजार ८०० रुपये आहे.
Ans: ठाणे येथील साहिल संजय पवार (वय २९) आणि राम मारुती ससाणे (वय ३५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Ans: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चारगाव फाटा परिसरातील हायवे पॉइंट धाब्यासमोर साकोली पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.






