
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मृत महिला आणि तिचा पती हे मोटारसायकलवरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेने दिराला मुलगी पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी महिला ही मोटारसायकल वरच्या मागील सीटवर बसल्या होत्या. तर महिलेचा पती हा गाडी चालवत होता. सकाळच्या वेळी हे दाम्पत्य सिव्हिल हॉस्पिटलसमोर पोहोचले असतानाच मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की महिला बाईकवरून खाली पडल्या आणि डंपरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती अपघातात गंभीर जखमी झाला असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
डंपर चालकाला अटक
या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ट्रॅक करून अटक केली. पोलिसांनी डंपर जप्त केले असून, चालकाविरुद्ध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदनी मच्छिंद्र दोलतडे (वय ३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर जखमी पती मनोज कृष्णदेव दोलतडे (वय ३२) आहे. अपघातानंतर मिरज- पंढरपूर मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होती.
Ans: मिरज-पंढरपूर मार्गावर सिव्हिल हॉस्पिटलसमोर डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
Ans: नंदनी दोलतडे (32) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मनोज दोलतडे गंभीर जखमी झाले.
Ans: सीसीटीव्हीवरून ओळख पटवून पोलिसांनी चालकाला अटक केली व डंपर जप्त केला. पुढील तपास सुरू.