
crime (फोटो सौजन्य: social media)
सांगली: सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाढदीवसाच्या दिवशीच मुळशी पटर्न चित्रपटातील दृश्यप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्या झालेल्या अध्यक्षांचे नाव उत्तम मोहिते असे आहे.
Pune Crime: पार्थ पवार यांच्या मामे भावाला अटक होणार ? पुण्यातील जागेचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग
कशी केली हत्या?
मंगळवारी उत्तम मोहिते यांचे वाढदिवस त्यांच्याच घराजवळ साजरा करण्यात येत होता. यानिमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला केला. त्यांनतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
हल्ला करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याला त्यावेळी संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तेव्हा तो देखील जखमी झाला होता.त्याच्यावर देखील सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. घटनेननंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही हत्या कोणत्या उद्देश्याने करण्यात आली हे स्पष्ट झालं नसून पोलीस याचा तपास करत आहे. आरोपीचा उपचार झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार आहे.
सांगली हादरली! शिवीगाळीच्या रागातून मित्रांकडून तरुणाची हत्या
सांगलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांनी रात्री पार्टी केली आणि त्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळवरून वाद वाढला आणि हत्या झाली.
Ans: शाहरुख शेख
Ans: वाढदिवसाच्या दिवशी
Ans: रुग्णालयात उपचाराखाली