पुणे: पुण्यातील बहुचर्चित असणाऱ्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सरकारी जमीन ही एक रुपया न भरता खाजगी कंपनीच्या नावाने करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार बाहेर आल्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार केला आहे अस सांगण्यात आल आणि १८०० कोटी रुपये बाजार भाव असलेली जमीन ही ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे.
Pune Crime: आंदेकर टोळीचा नामोनिशान मिटवायला सुरुवात! कडक बंदोबस्तात कारवाई
चौकशीच्यात फेऱ्यात कोण अडकणार?
आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागाला पत्र दिल आहे. या पत्रात त्यांनी व्यवहार कसा झाला याची माहिती मागितली आहे. हा व्यवहार कसा झाला याची कागदपत्र आल्यावर चौकशीसाठी पुणे पोलीस नोटीस देणार आहेत. सुरुवातीला पोलीस तपासणार आहेत या मध्ये कोण कोण सहभागी आहे? दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता पुणे पोलीस चौकशीसाठी नोटीस देणार आहेत.
पार्थ पवार यांचा मामेभाऊ दिग्विजयला अटक होणार ?
अमेडीया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांची पथक त्याचा शोध घेत आहेत. त्या जमिनीचा व्यवहार जरी रद्द झालेला असला तरी सही करण्यासाठी त्यांना मुद्रांक शुल्क कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. या चौकशीसाठी त्यांना नोटीस दिली जाते की बोलवल जात हे पाहावे लागेल. मात्र शीतल तेजवानी ही परदेशात गेल्याच बोलल जात आहे. जी या प्रकरणात पॉवर ऑफ अटर्नी होती. या दोघांवर तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचा आता शोध घेतला जातो की ते स्वतः हजर राहतात हे कळेल. मात्र आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे. याचा तपासात आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
Ans: पोलीस
Ans: आर्थिक
Ans: अजित






