
crime (फोटो सौजन्य: social media)
सहलीला गेलेल्या 22 विद्यार्थ्यांना विषबाधा; 3 विद्यार्थी गंभीर, ICU मध्ये उपचार सुरु
कुपवाड येथे २२ वर्षीय तरुणाची हत्या
सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या झाल्या. एक कुपवाड मध्ये तर दुसरी जत मध्ये. कुपवाड एमआयडीसी येथे राहुल सुनील कदम या 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्याची हत्या तलवार आणि कुकरीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. मृतक राहुल सुनील कदम हा सराईत गुन्हेगार होता. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. राहुलची हत्या त्याचाच मित्राने केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी निखिल अनिल यादव, रमेश मुकेश जाधव आणि विनायक उत्तम सूर्यवंशी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
जत येथे २६ वर्षीय तरुणाची हत्या
तर दुसरी हत्या ही जत येथे झाल्याचे समोर आले आईच. जत येथे यात्रेत फिरण्यासाठी गेलेल्या विकास मलकारी या २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. विकास याची हत्या दगडाने ठेचून व धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सांगलीत खुनाचे सत्र सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी योग्य तपास करुन दहशत माजवणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
Ans: सांगली जिल्ह्यात कुपवाड आणि जत येथे एकाच दिवशी दोन खून झाले.
Ans: राहुल कदम याचा खून पूर्ववैमनस्यातून त्याच्याच मित्रांनी केला.
Ans: विकास टकले याची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.