Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Suicide News: “मी तुला सांभाळले असते…” पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!

Student Suicide News: सांगलीतून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. दिवसभर मेहनत करून रात्र शाळेत शिकणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने बारावीचा पेपर कठीण गेल्याच्या तीव्र नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. एकुलत्या एका मुलाच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 01, 2026 | 12:10 PM
Student Suicide News: "मी तुला सांभाळले असते..." पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!

Student Suicide News: "मी तुला सांभाळले असते..." पेपरच्या तणावातून एकुलत्या एका मुलाने संपवले आयुष्य; सांगलीत शोककळा!

Follow Us
Follow Us:
  • बारावीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास
  • आई कामावरून आल्यावर प्रकार उघडकीस आला
  • पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे
Student Suicide News: सांगली शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका १८ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून आपले जीवन संपवले आहे. ऑक्टोबर महिन्यातील परीक्षा संपल्यानंतर घरात कोणी नसलेल्या संधीचा फायदा घेत त्याने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. दत्तात्रय विठ्ठल नरळे (वय १८, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, साखरकारखाना, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून, संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Mother Son Suicide News: सीसीटीव्ही फुटेजने उघडले गुपित! मातेने चिमुरड्याला १८ व्या मजल्यावर नेऊन संपवले आयुष्य; वाकडमधील थरार!

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हा कष्टाळू मुलगा होता. दिवसा मेहनत करून आणि रात्र शाळेत जाऊन तो आपले शिक्षण पूर्ण करत होता. सध्या त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. मात्र, नुकताच झालेला ऑक्टोबरमधील एक पेपर अपेक्षेपेक्षा खूप अवघड गेल्यामुळे तो तीव्र मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात वावरत होता.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्याने साडीच्या साहाय्याने घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. काही वेळेने त्याची आई कामावरून घरी परतली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. कितीही हाक मारली तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, दत्तात्रयने गळफास घेतल्याचे भयानक दृष्य समोर आले. उपस्थितांनी तातडीने त्याचा गळफास सोडवून त्याला तातडीने शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा: Jalna Accident News: पुलावरील नियंत्रण सुटले अन् कंटेनर ढाब्यावर आदळला; चेंदामेंदा झालेल्या गाडीत दोघे जागीच मृत!

आईचा हदय पिळवटून टाकणारा टाहो

दत्तात्रय हा नरळे कुटुंबातील एकमेव मुलगा होता. आपल्या लाडक्या मुलाने नैराश्यातून असे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजताच आईला मोठा धक्का बसला. “फक्त पेपर अवघड गेला म्हणून टोкаचे पाऊल उचलण्याची काय गरज होती? मी तुला आयुष्यभर कोणत्याही संकटातून सांभाळले असते रे!” असे म्हणत आईने फोडलेला हंबरडा उपस्थित सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात अभ्यास व पेपरच्या तणावातूनच मुलाने हे कृत्य केल्याचे पालकांनी सांगितले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सांगली शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील भगत प्लॉट भागात ही दुर्दैवी घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते आणि तो काय करत होता?

    Ans: दत्तात्रय विठ्ठल नरळे (वय १८) असे त्याचे नाव असून, तो दिवसा काम करून रात्र शाळेत बारावीचे शिक्षण घेत होता

  • Que: त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले?

    Ans: बारावीचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून आणि तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Web Title: Sangli news 18 year old student commits suicide sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Sangli
  • Student Suicide

संबंधित बातम्या

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा
1

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध
2

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.