संग्रहित फोटो
मृत माय-लेकाची नावे एकता मनोज भांगड (वय ३३) आणि माधव मनोज भांगड (वय ६) अशी आहेत. एकता यांचे पती येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीस आहेत. हे मूळचे राजस्थानचे कुटुंब असून गेल्या दोन वर्षांपासून वाकड येथील सिग्नेचर पार्क सोसायटीत राहत होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता, एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला आढळल्या असून, त्यांनी स्वतःहून खाली उडी मारून जीवन संपवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. माहिती मिळताच वाकड पोलिसांनी आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हेही वाचा: 18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
घटनास्थळावर पोलिसांना एकता यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली ७ ते ८ पानांची एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली आहे. या चिठ्ठीतील मजकुराने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत:
वाकड पोलीस सध्या या चिठ्ठीतील प्रत्येक मुद्द्याची आणि हस्तक्षरांची सखोल छाननी करत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Ans: पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील 'सिग्नेचर पार्क' सोसायटीत शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
Ans: एकता मनोज भांगड (वय ३३) आणि त्यांचा ६ वर्षांचा मुलगा माधव मनोज भांगड अशी त्यांची नावे आहेत.
Ans: गेल्या अनेक वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त असूनही आजाराचे निदान होत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले, असे सुसाईड नोटवरून स्पष्ट होते.






