Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि संशयास्पद हालचाली;अंजली दमानियांनी थेट पुरावेच दिले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पूर्ण कल्पना होती आणि त्यांनीच आरोपींना शोधण्यासाठी आपले कार्यकर्ते पाठवले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2025 | 05:07 PM
Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक

Maharashtra Politics : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याला जोरदार प्रतिवाद करत, मुंडेंनी वाल्मिक कराडला पद्धतशीरपणे आत्मसमर्पण करायला लावल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा सनसनाटी दावा केला आहे.धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अचानक आत्मसमर्पण करावे लागले, यामागे मोठे राजकीय गणित असल्याचे दमानियांचे म्हणणे आहे. हे प्रकरण स्वतःच्या अंगावर येईल, हे लक्षात येताच मुंडे यांनी कराडला नियोजित पद्धतीने हजर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले, असे त्या म्हणाल्या.

बालाजी तांदळेची संशयास्पद भूमिका

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते बालाजी तांदळे यांनी आरोपींना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्या फिरत असल्याचा दावा केला. आधी 60-70 गाड्या फिरत असल्याचे सांगितले गेले, तर नंतर 200 गाड्या शोधासाठी फिरत होत्या, असा तांदळेचा विरोधाभासी दावा समोर आला. मात्र, या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीत तांदळे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा आरोपपत्रात समावेश नाही, हे विशेष आहे.

‘आम्हाला कमी समजण्याची चूक करु नका’; हिजबुल्लाहचा इस्त्रायलला इशारा, अमेरिकेवरही आरोप

गुन्हेगारांवर कारवाई न झाल्यास कायद्याचा धाक उरणार नाही

या संदर्भात अंजली दमानिया यांनी जोरदार मागणी केली आहे की, बालाजी तांदळे आणि इतर संशयित पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, न्याय सर्वांसाठी समान असेल तर दोषींवर कोणतीही गय न ठेवता कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी आणि राजकारणाचा संगनमताचा आणखी एक नमुना आहे की काय, हे पुढील तपासातून स्पष्ट होईल. मात्र, गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असेल, तर कायद्याचा धाक कमी होतो, आणि त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. त्यामुळे सरकार आणि यंत्रणांनी यावर कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

 

Maharashtra Budget 2025 : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने; विधानभवनाच्या लॉबीत नक्की काय

धनंजय मुंडे यांना सर्व माहिती होती – अंजली दमानियांचा गंभीर आरोप

संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पूर्ण कल्पना होती आणि त्यांनीच आरोपींना शोधण्यासाठी आपले कार्यकर्ते पाठवले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.दमानिया यांनी सांगितले की, मी धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकांशी बोलले, तेव्हा मला बालाजी तांदळे याच्याविषयी माहिती मिळाली. पोलिसांनी नव्हे, तर आम्हीच आरोपी शोधले, असे बालाजी तांदळे देशमुख यांच्या कुटुंबीयांना सांगत होता. यामुळे धनंजय मुंडे अत्यंत संतापले होते. त्यांनी तांदळेला थेट सुनावत “तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय,” असे म्हटल्याचे दमानिया यांनी सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आपल्यावर येणार, हे लक्षात येताच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना शोधण्यास सुरुवात केली, असे दमानिया म्हणाल्या. हे संपूर्ण प्रकरण वाल्मिक कराडवर ढकलून आपल्याला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आरोपींना शोधण्यासाठी पाठवले, असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं? कृषी क्षेत्रासाठी किती तरतूद?

सीआयडी आरोपपत्रात महत्त्वाची नावे वगळली?

याप्रकरणात सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे नाहीत, असा धक्कादायक दावा दमानियांनी केला. 200 आरोपींच्या यादीतून पोलीस अधिकारी आणि बालाजी तांदळे यांचे जबाब वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एलसीबीचे अधिकारी गीत्ते यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दमानियांची मागणी – सर्वांना सहआरोपी करा

“माझी स्पष्ट मागणी आहे की, या सर्वांना सहआरोपी करा!” असे ठाम मत दमानियांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी फक्त एकट्या वाल्मिक कराडवर कारवाई करून धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Santosh deshmukh murder case and suspicious movements anjali damania gave direct evidence nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • anjali damania

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.