उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने; विधानभवनाच्या लॉबीत नक्की काय घडलं?
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. मात्र दोघांना ना हस्तांदोलन केलं ना नजरेला नजर भिडवली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला. फडणवीसांनी ठाकरेंशी हस्तांदोलनही केलं. त्यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व नेते विधानभवनाच्या लॉबीत आले होते. यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणिर उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाले. यावेळी फडणवीस आले, नमस्कार केला, उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले – काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत. त्यावर सगळे (अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर) सगळे खळाळून हसले, आणि पुढे निघून गेले.
विधानसभेच्या सभागृहात राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असतात. परंतु बाहेर भेटल्यावर मिश्कील टोलेबाजी करत असतात. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत? असं म्हणण्याचं कारण म्हणजे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आहेत. त्यांनी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका परिसंवादात शिवसेना उबाठावर गंभीर आरोप केला होता. शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज घेतल्या जातात, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आज अचूक वेळ साधत टोला लगावला.
अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प तुटीचा आहे. अनेक योजनांचा खर्चाचा बोजा त्यात आहे. त्यामुळे कोणतीही मोठी घोषणा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दादा, तुमचा हा अर्थसंकल्प दिसत नाही, असे म्हटले.
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दिसताच न थांबता पुढे निघाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरेसुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहून थांबले नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद अजून कायम असल्याचे दिसून आले.