'आम्हाला कमी समजण्याची चूक करु नका'; हिजबुल्लाहचा इस्त्रायलला इशारा, अमेरिकेवरही आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: सध्या इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्धविराम सुरु आहे. दरम्यान हिजबुल्लातून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. लेबनॉनच्या सशस्त्र दल हिजबुल्ल्हा आणि इस्त्रायलमध्ये तणाव अद्यापही आहे. दरम्यान हिजबुल्लाहचे नवे प्रमुख नईम कासिम यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे आहे. त्यांनी अमेरिकेला हिजबुल्लाहला कमी न समजण्याचा इशार दिला आहे. नईम कासिम यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या गटाचा कमतरता मान्य केला मात्र, त्यांनी म्हटले की, आम्हीही आजही मजबूत आहोत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावरील हल्ल्याचा हवाला देत, हिजहुल्लाह ताकदवार असल्याचे म्हटले आहे.तसेच त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमद्ये इस्त्रायली हल्ल्यात नसरहल्ल्याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहची कमान स्वीकारली असल्याचे सांगितले आहे.
आमची लढाऊ क्षणता कमी नाही- कासिम
हिजबुल्लाहची कमान स्वीकारल्यानंतर नईम कासिम यांनी, हिजबुल्लाहच्या सुरक्षेत काही त्रुटी होत्या, मात्र त्या दुसरुस्त करण्यात आल्या असून आता हिजबुल्लाह मजबूतपण उभा आबे. इस्त्रायलने लेबनॉनमधून सैन्य माघारी न घेतल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इस्त्रायलने आम्हाला कमकुवत समजण्याची चूक कुरू नका, आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.
आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू
कासिम यांनी, हिजबुल्लाहच्या लढवय्यांना संबोधित करत म्हटले की, ” तुम्ही नसरल्लाहचे पुत्र आहात. आपण त्यांच्या मृत्यूकडे विजयाची घोषणा म्हणून पाहिले आहे. तसेच त्यांनी असही म्हटले आहे ती, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार लोक आहोत. याशिवाय, इराणच्या भूमिकेचेही कौतुक कासिम यांनी केले आहे.
नेतन्याहूंच्या घरावरील हल्ल्याचा उल्लेख
कासिम यांनी हिजबुल्लाहच्या क्षमतेबद्दल भाष्य करताना, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवसस्थानावरील केलेल्या हल्ल्याचा हवाला दिला. त्यांनी म्हटले की, नेतन्याहूंच्या घरापर्यंत आमची पोहोच असून हे सिद्ध होते की आमची लढाऊ क्षमता अजूनही अबाधित आहे. सध्या आम्ही नवीन धोरणांवर कार्य करत आहोत. इस्त्रायलने लेबनॉनमधून सैन्या माघारी न घेतल्यास याचा गंभीर परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेवरही आरोप
याचवेळी नईम कासिम यांनी अमेरिकेवरीही गंभीर आरोप केले आहे. कासिम यांनी अमेरिकेवर लेबनॉनच्या सरकारी नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही अमेरिकन हस्तक्षेपाला लवकरच तोंड देऊ.