Bajrang Sonawane : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन आज 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. आता तर पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत आहेत का, इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे फिरतायेत, असा सवाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. आज सकाळीच बीडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांसह राज्य सरकारलाही धारेवर धरलं. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले.
खासदार बजरंग सोनवणे यांनी हा खून एकाएकी झाला नसल्याचा दावा केला. बजरंग सोनवणे म्हणाले, ” आरोपींनी आवाडा कंपनीतील अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यावेळी सोनावणे नावाच्या वॉचमनलाही मारहाण केली. त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. संतोष देशमुख यांना सेक्युरिटी गार्डने ही घटना सांगितलं. त्यांनी सरपंच देशमुखांकडे मदतीची मागणी केली. संतोष देशमुख हा वाद सोडवण्यासाठी तिथे गेले होते. पण सरपंचांसह लोकांनी त्या वादात मध्यस्थी केली.
त्यानंतर संतोष देशमुख आणि वॉचमन सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एक तक्रार दाखल करून घेण्यासाठी त्यांना तिथे 3-4 तास बसवून ठेवण्यात आलं तरीही त्यांनी फिर्याद घेतली नाही. पोलिसांनी जातीवाचक विरोधी गुन्हा दाखल करता, थातुरमातुर फिर्याद लिहून घेतली. यातल्या आरोपांनी 9 तारखेला अटक दाखवून जामीनही मंजूर केला. मग साधाच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना कुणी फोन केला. याचाही तपास होणं गरजेचं आहे. त्या दिवशी 6 तारखेलाच फोन कुणी घेतला.
सोमवारी 9 डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन मिळाला, त्यानंतर तिथले पीएसआय त्या आरोपींसोबत जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. इतकेच नव्हे तर, हे सर्व सुरू असतानाच एका हॉटेलमध्ये संबंधित सरपंचांच्या भावाला बोलावूनही काहीतरी बोलल्याचे व्हिडीओ आहेत. त्यातच कोणीतरीहा व्यवहारिक विषय असल्याचे म्हणत आहे. हा व्यहारिक विषय आहे. पण व्यवहारातून झालं. पण या गोष्टींचा अर्थ वेगळाचा होता. 9 तारखेला पीएसआय पाटील त्या आरोपींसोबत होते. मग आरोपींसोबतच पीएसआय़ देखील या कटात सामील होते का, असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. हे पीएसआय यात सहआरोपी झाले पाहिजे. अशी माझी मागणी होती.
Baby John: थेरीच्या रिमेक ‘बेबी जॉन’वर दलपती विजयने सोडले मौन, ॲटलीशी केला
पण 9 तारखेला ही जी घटना घडली त्यावेळी सरपंच लातूरला गेले होते. लातूरहून आल्यानंतर अगदी चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. त्यांच्यामागेपुढे गाड्या ठेवून त्यांची गाडी अडवली गेली. त्यांना गाडीतून ओढून काढण्यात आले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांना उचलून नेलं गेलं, अशी माहिती मला स्थानिकांच्या माध्यमातून कळाली. पोलिसांनी आतापर्यंत डिटेल वृत्तांत दिला नाही. माझ्या लोकांनीही मला याबाबत माहिती दिली. जसा मला मेसेज मिळाला. तेव्हापासून मी एसपींशी संपर्कात होतो. पण काही वेळानंतर मला हे अपहरण नसून ह्त्या झाल्याची बातमी कळाली. संतोष देशमुख हे मी ज्या जिल्हापरिषद गटातून निवडून गेलो, मस्साजोग गावचे सरपंच होते. गेल्या 8-10 वर्षांत त्यांनी प्रचंड सक्रियतेने काम केले. त्यांनी कधीही जातीय वाद होऊ दिला नाही.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारलं गेलं, हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे. ते कुणीही गांभिर्याने घेतलं नाही. मी त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला. त्यात माराच्या 56 खुणा आहेत. प्रथमदर्शनी हे दिसत आहेत. असं काय गुन्हा केला होता त्याने. एका वॉचमनसाठी तो न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला होता. त्यासाठी त्याला मारंल गेलं. घटना घडल्यावर ९ तारखेला सरपंचाच्या भावाला कोण बोललं. बनसोड नावाचा पोलीस अधिकाऱ्याला कुणाचा फोन आला होता. पाटील आणि महाजन या अधिकाऱ्यांना कुणाचा फोन आला, या सर्वांचे सीडीआर काढा. तसं केलं तरच गुन्हेगार सापडतील, असे ते म्हणाले.