काय घडलं नेमकं
धनाजी तानाजी सावंत असं या प्रकरणातील प्राध्यापकाचं नाव आहे. पाप्री, तालुका मोहोळ आणि जिल्हा सोलापूर असं प्राध्यापकाच्या मूळ गावाचा नाव आहे.प्राध्यापक धनाजी सावंत याने 12 मार्च रोजी एका पीडितेला मोबाईलवरून अश्लील मेसेज केले होते. नंतर तिला शरीरसुखाची मागणी देखील केली होती. या घटनेची माहिती पीडितेनं कुटुंबीयांना दिली होती. कुटुंबीयांनी थेट पोलीस उंब्रज ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात संतापाची लाट आहे.
’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…
सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला शिक्षकाने एका विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कराड तालुक्यातील मलकापूर शहरात असलेल्या एका शाळेत घडली. या प्रकरणी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील पीडित मुलगी ही नववीत शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलाविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडला, असा आरोप आहे.
गुन्हा दाखल
ही घटना घडताच घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. त्यांनंतर तिने घडलेली घटना मैत्रिणी व कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Ans: सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे ही घटना घडली.
Ans: प्राध्यापकाने विद्यार्थीनीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केली.
Ans: पीडित विद्यार्थिनीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.






