दिवाळी म्हटलं की कुटुंबीयांसोबत एकत्र येण्याचा आनंद काही औरच असतो. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी यंदाची दिवाळी आपल्या लातूरमधील बाभळगाव या मूळ गावी कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहात साजरी केली. देशमुख कुटुंबाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.या फोटोंमधून देशमुख कुटुंबाचा एकत्रित आनंद आणि पारंपरिक दिवाळी उत्सवाची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी यंदाची दिवाळी आपल्या लातूरमधील बाभळगाव या मूळ गावी कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहात साजरी केली.

रितेश देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख, जिनिलीया आणि दीपशिखा देशमुख यांनी दिवाळी सेलिब्रेशनचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दीपशिखा धीरज देशमुख यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यावेळी कुटुंबातील तिन्ही सुनांनी सासूबाईंसोबत खास फोटो आणि सेल्फी काढत दिवाळीचा आनंद साजरा केला.

आई वैशालीताई देशमुख यांनी आपल्या नातवंडांसोबत आरती करत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. तर देशमुख कुटुंबातील तिन्ही सुनांनी सासूबाईंसोबत काढलेला खास सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

देशमुख कुटुंबियांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.देशमुख कुटुंबाच्या या जिव्हाळ्याच्या क्षणांवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.






