Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: वाईतील धोम धरण परिसरात विनापरवाना दूध वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Satara News: केवळ वाहनचालकांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर विनापरवाना आणि विनाचाचणीचे दूध स्वीकारल्याचा संशय असलेल्या संबंधित डेअरींचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 09:53 AM
Wai News, FDA Raid, Milk Adulteration, Satara District Crime

Wai News, FDA Raid, Milk Adulteration, Satara District Crime

Follow Us
Follow Us:
  • अन्न व औषध प्रशासनाची  दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल सहा वाहनांवर कारवाई
  • वाहनचालकांकडे दूध संकलन किंवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नव्हता
  • दूध वाहतूक करण्यामुळे व दुधामुळे भविष्यात कोणत्याही नागरिकाच्या आरोग्याला धोका
Wai News: वाई तालुक्यातील धोम धरण परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धडक छाप्यात परवान्याशिवाय दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. व बारा दुधाचे नमुने तपासणी करता अन्न औषध प्रशासनाने नेहले आहेत या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, दूध व्यवसायातील बेकायदेशीर व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडे दूध संकलन किंवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नव्हता. याशिवाय, संकलित केलेल्या दुधाची गुणवत्ता अथवा भेसळ तपासणी न करताच ते विविध डेअरींकडे पाठविले जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. व शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या डेऱ्यांमध्ये हे दूध घालत होते त्या डेऱ्यांवर पण कारवाई होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दुधाची कोणतीही प्रयोगशाळा चाचणी न करता त्याचा पुरवठा होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात

अशा विनाचाचणीच्या व विनापरवाण्याच्या दूध वाहतूक करण्यामुळे व दुधामुळे भविष्यात कोणत्याही नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. कारवाईत काय आढळले?

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात दूध तपासणीसाठी सहा गाड्यांमधील प्रत्येकी दोन दोन असे १२ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत नामदेव महादेव नवघने (रा. वासोळे) यांच्या वाहनातून २६५ लिटर (६५ लिटर गायीचे, २०० लिटर म्हशीचे) दूध जप्त करण्यात आले. हे दूध नियती डेअरी, वाई येथे नेले जात होते. आत्माराम शिवाजी चिकणे (रा. वडवली) यांच्या वाहनातून ३०० लिटर (१२० लिटर गायीचे, १८० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध श्रीकृष्ण डेअरी, वाई येथे जाणार होते. प्रकाश तुकाराम गावडे (रा. वाई) यांच्या वाहनातून २६० लिटर (१५० लिटर गायीचे, ११० लिटर म्हशीचे) दूध मिळाले. हे दूध खामकर डेअरी, वाई येथे जमा होणार होते.

अजित दत्तात्रय चोरट (रा. कोंढवळी) यांच्या वाहनातून तब्बल ४४० लिटर (१२० लिटर गायीचे, ३२० लिटर म्हशीचे) दूध जप्त करण्यात आले. हे दूध भैरवनाथ दूध, पसरणी येथे जाणार होते. ओंकार शिवाजी सणस (वेलंग) यांच्या वाहनातून १६० लिटर (६० लिटर गायीचे, १०० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध श्रीकृष्ण डेअरी, वाई येथे पोहोचविले जाणार होते.प्रदीप प्रकाश जाधव (रा. वेलंग) यांच्या वाहनातून २२० लिटर (१६०) लिटर गायीचे, ६० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध खामकर दूध डेअरी, वाई येथे जात असल्याचे सांगण्यात आले.

‘लहानांवर कारवाई, मोठ्यांना अभय?’ काही दिवसांपूर्वी वाई शहरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून प्रशासनाने मोठी मोहीम राबवल्याचा दावा केला होता. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध व्यवसायातील बेकायदेशीर प्रकारांवर आतापर्यंत प्रभावी कारवाई का झाली नाही, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

अखेर या धडक मोहिमेत सहा वाहने पकडली गेली असली, तरी या साखळीतील इतर संबंधित घटकांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी ए. ए. वायकुळे, प्रियांका वाईकर, रुपाली खापणे आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली.

डेअरींचीही चौकशी करण्याची मागणी

केवळ वाहनचालकांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर विनापरवाना आणि विनाचाचणीचे दूध स्वीकारल्याचा संशय असलेल्या संबंधित डेअरींचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चौकशीत नियमभंग किंवा अन्य कायदेशीर उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
वाई तालुक्यातील या कारवाईमुळे दूध व्यवसायातील नियमपालन, अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

 

Web Title: Satara wai fda raid illegal milk transportation dhom dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Wai News

संबंधित बातम्या

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!
1

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा
2

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक
3

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल
4

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.