Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satish Wagh Case: गुप्तांग कापलं, 72 वेळा चाकून भोसकलं; सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

Satish Wagh Case News : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 27, 2024 | 12:38 PM
गुप्तांग कापलं, 72 वेळा चाकून भोसकलं; सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर (फोटो सौजन्य-X)

गुप्तांग कापलं, 72 वेळा चाकून भोसकलं; सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Satish Wagh Case News In Marathi: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य (एमएलसी) योगेश टिळेकर यांचे मामा महाराष्ट्रातून बेपत्ता झाले आहेत. त्याचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या केल्याची बातमी समोर आली. यांच्या हत्येने खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आल्यानंतर आणखीनच खळबळ उडाली. आमदार योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांचा खुन करण्यामागे त्यांची पत्नी मोहिनी वाघ (Mohini Satish Wagh) हीच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वत:च्या पतीची हत्या करण्यासाठी तिने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने होणारी मारहाण, संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या कारणास्तव ही हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून केली हत्या; आरोपी अटकेत

अपहरण करून हत्या करण्यात

पोलिसांनी सांगितले की, ५५ वर्षीय सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याची हत्या करण्यात आली. पुणे शहरातील हडपसर परिसरातील शेवाळवाडी चौकाजवळ त्यांना कारमध्ये नेण्यात आले. त्याचा मृतदेह जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील यवतजवळ अपहरण स्थळापासून 40 किमी अंतरावर आढळून आला.

अक्षय भाड्याने राहत होता

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, त्यानंतर मोहिनी वाघ (49) हिला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, अक्षय जवळकर (29) हा सतीश वाघ यांच्या घरात भाड्याने कुटुंबासह राहत होता. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून येथे राहत होते. यादरम्यान अक्षय आणि मोहिनीचे अफेअर होते.

दीड वर्षांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले

सुमारे दीड वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना दोघांवर संशय आला. एके दिवशी त्याने दोघांना रुममध्ये एकत्र पकडले आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. मात्र, बदनामीच्या भीतीने सतीशने कोणतीही कारवाई केली नाही आणि अक्षयच्या कुटुंबीयांना इशारा देत घर रिकामे करण्यास सांगितले. अक्षयचे कुटुंब निघून गेले. सतीशला वाटलं प्रकरण इथेच संपलं पण तसं नव्हतं.

वर्षभरापूर्वीच हत्येचा कट रचला

घरातून बाहेर पडल्यानंतरही अक्षय आणि मोहिनीचे अफेअर सुरूच होते. दोघांना एकत्र राहायचे होते पण सतीश जिवंत असेपर्यंत हे शक्य नव्हते. यानंतर मोहिनीने सतीशला मारण्याचा कट रचला. वर्षभरापूर्वी नियोजन सुरू झाले. अक्षयला सुपारी मारणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यास सांगण्यात आले. अक्षयने चार जणांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली. हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना 72 वेळा चाकूने भोसकलं, तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला. अनैतिक संबंधांतून ही हत्या करण्यात आली आहे. अक्षयकडे तेवढी रक्कम नव्हती म्हणून मोहिनीने पैसे देण्याचे आश्वासन दिले. मोहिनीने खुनाच्या ठेक्यासाठी ॲडव्हान्सही दिला. याप्रकरणी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांच्याशिवाय पवन श्यामसुंदर शर्मा (30), नवनाथ अर्जुन गुरसाळे (31), विकास सीताराम शिंदे (28) आणि आतिश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्ह्यातून आरोपीचे नाव वगळणे पडलं महागात; पीएसआयचं तडकाफडकी निलंबन

Web Title: Satish wagh murder case satish waghs financial or immoral relationship behind the murder what exactly is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • Pune
  • satish Wagh

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.