Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी तपासण्यासाठी शाळेत विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; पालकांचा संताप; मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 10, 2025 | 09:52 AM
school (फोटो सौजन्य- social media)

school (फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ  केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एका शिपायाचा समावेश आहे.

दगडाने ठेचून सराईत गुन्हेगाराची हत्या; मुलांना त्रास देत असल्याने सात जणांनी मिळून संपवलं

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास ३००च्या अधिक मुली शिक्षण घेत आहेत. ८ जुलैला सकाळी १० ते १२ च्या सुमारास मुख्याध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यांनतर शाळेलतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरूमच्या काडीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.

यानंतर विद्यार्थिनींना मासिक पाळी आले आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली. त्यांनतर ज्या मुलींना मासिक पाळी आलेली आहे. त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास ५ शिक्षकांना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूमध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले.

या धोक्कादायक घटनेची माहिती पालकांना समजताच आज पालकांनी ( 9 जुलै रोजी ) शाळा गाठत मुलींसोबत या घडलेल्या प्रकारचा जाब विचारला आणि गोंधळ घातला. त्याचबरोबर इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप पालकांनी केला दमाणी स्कूलमधील मुख्यध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली.

याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावेळी पीडित मुलींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र आले. पोलिसांनी भा.न्या. संहिता कलम 74, 76 सह कलम 11, 12, 29 पोक्सो अन्वये मुख्यध्यापिकेसह 5 शिक्षिका व शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापिकेला कामावरून कमी करण्यात आल्याचं शाळा प्रशासनाने म्हंटल आहे.

Pune Crime News: धर्म स्वीकार नाहीतर….; पुण्यात धर्मांतरासाठी 19 वर्षीय विवाहितेवर दबाव, शारीरिक मारहाण आणि शिवीगाळ

Web Title: Schoolgirls stripped naked to check menstruation parents outraged case registered against eight people including principal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • Crime . Crime News
  • thane

संबंधित बातम्या

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा
1

Thane News : ” …तर सोमवारपासून अर्धनग्न बेमुदत उपोषण”; महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा इशारा

ठाणे महानगरपालिकेच्या भरतीत मुदतवाढ! अर्ज कर्त्यांनो, वाढ्त्या मुदतीचा घ्या फायदा
2

ठाणे महानगरपालिकेच्या भरतीत मुदतवाढ! अर्ज कर्त्यांनो, वाढ्त्या मुदतीचा घ्या फायदा

ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन! नयनरम्य देखावा
3

ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन! नयनरम्य देखावा

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट
4

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.