पुण्यात १९ वर्षीय विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तिच्या घरातून दबाव टाकण्यात आला होता. या प्रकरणी पीडितेने समर्थनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची सगळी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर हे धक्कदायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्यता माहितीनुसार, पीडितेच्या नंदेने तिला सातत्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पडण्याच्या प्रयत्न केला. मात्र महिलेनं धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली, शारीरिक मारहाणी करण्यात आली. एवढेच नाही तर, फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने देखील विवाहितेला धमकी दिलीकी मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस, जर तू धर्म स्वीकारला नाहीस तर, तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. त्यांनतर महिलेने पोलीस ठाणे गाठत महिलेच्या ननंद आणि फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaun Crime News: बेळगावात एकाच कुटुंबाने एकत्रच प्यायलं विष; कारण अस्पष्ट
बेळगाव शहरातून एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकाची स्थिती गंभीर आहे. मृतकांची नावे संतोष खुराडेकर (४४), सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर अशी आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तीचे नाव सुनंदा कुराडेकर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली आहे. या घटनेमुळे जोशीमाळा परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज (९ जुलै २०२५) सकाळच्या नऊ वाजताच्या सुमारास या कुटुंबाने विष प्रश्न केले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रकृती गंभीर असलेल्या मुलीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही घटना शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या सुनंदा कुराडेकर मृत्यूशी झुंज देत आहे. या कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नाही. त्यमकुळे अद्याप आत्महत्या करण्यामागचा कारण काय आहे हे समजलेले नाही.