सिंधुदुर्ग: मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याला शुक्रवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचे सांगत, आपटे यांना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम लागू होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. हा निर्णय न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिला. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आपटे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, तपास पूर्ण झाल्यामुळे आणि दुर्घटनेत कोणीही जखमी न झाल्याने त्यांना जामीन देण्यात आला आहे.
4 डिसेंबर 2024 रोजी नौदल दिनाच्या निमित्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झालं होतं. पण पुतळा उभाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. 26 ऑगस्ट 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा कोसळला होता. शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला. संतापलेल्या नागरिकांनी त्याठिकाणी आंदोलनेही केली. या घटनेनंतर पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाले होते. पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक करण्यात आली होती.
Beed News Update: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ गुन्हा दाखल; पण वाल्मिक कराडला दिलासा
पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील आणि जयदीप आपटेला यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. सुनावणीदरम्यान आपटे यांच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवाद करताना , “आपटे यांनी पुतळ्याच्या बांधकामासाठी 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांनीच पुतळा कोसळावा अशी तजवीज केली असण्याचा दावा अवास्तव असल्याचा दावा केला. तसेच, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम लावता येणार नाही, असेही वकिलांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ समिती नेमली होती. समितीने तयार केलेला गोपनीय अहवाल सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर करून आपटे याची याचिका फेटाळण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने या अहवालातील निरीक्षणे ग्राह्य धरली नाहीत आणि आपटे यांना जामीन मंजूर केला. यापूर्वी, चेतन पाटील या आरोपीलाही न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणातील दोन्ही आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत.
Diesel Vehicle Ban: १० वर्षे जुन्या डिझेल गाड्यांवर येणार बंदी? वाढत्या AQI मुळे उच्च