लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणातील आठ आरोपींवर महाराष्ट्र कन्ट्रोल ऑफ ऑरगनाईज्ड क्राईम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, या प्रकरणातील सर्व आरोपींवर विशेष न्यायालयात खटला चालवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. तसेच खंडणी प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. राज्य सरकारच्या य निर्णयाचे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी स्वागत केलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले , जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे,कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार या आऱोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील खंडणीचे आरोप असलेल्या आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी केला जाणार आहे. मुख्यमंत्रीच याचे आदेश देतील, मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला आहे. या सर्वांना तुरूंगवारी झालीच पाहिजे. याशिवाय राज्यभरात या गुन्हेगांरांची जेवढी साखळी आहे. ते 400-500जण असतील. तर ही संघटन करून गुन्हेगारी करणारी टोळी आहे.मंत्री धनंजय मुंडेंनीच ही टोळी पाठवली आहे. ही लाभार्थी टोळी तपासून घ्या हेही सहआरोपी होऊ शकतात आणि परभणी प्रकरणालाही न्याय द्यावा असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत पडली फूट! ठाकरे बाहेर पडल्यामुळे शरद पवारांच्या नेत्यांनी घेतले तोंडसुख
संघटित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट) लागू करण्याचा निर्णय अनेकदा गुन्हेगारीची व्याप्ती रोखण्यासाठी घेतला जातो. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे त्यांच्यावर मकोका लागू करण्यात आला आहे. सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर हा निर्णय घेण्यात आला.
वाल्मिक कराडवर मकोका लागू नाही
देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मात्र मकोका लावण्यात आलेला नाही. तपास यंत्रणांनी स्पष्ट केले की कराड हा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नाही. तसेच या हत्येशी कराडचा कोणताही थेट संबंध असल्याचे सिद्ध करता आलेले नाही.
प्रत्येक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी:
देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर मागील दहा वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत, ज्यात 8 गुन्हे केज पो लीस ठाण्यात नोंदवले आहेत. यामध्ये चार मारहाणीचे, एक चोरीचा, एक अपहरणाचा आणि एक खंडणीचा गुन्हा समाविष्ट आहे.
महेश केदारवर धारूर पोलीस ठाण्यात 5गुन्ह्यांची नोंद असून, त्यात मारामारी, चोरी आणि खुनाचा प्रयत्न यांचा समावेश आहे.
२१ वर्षीय जयराम चाटेवर 3 वर्षांत 3 गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि दुखापतीचे गुन्हे आहेत.
२४ वर्षीय प्रतीक घुलेवर 2017 ते 2024 या कालावधीत 5 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये मारहाण व दुखापत करणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
केनियातील मालिंदी काउंटीमध्ये विमान अपघात; तिघांचा मृत्यू, विमानतळ सुरक्षा व्यवस्थेवर
फरार आरोपींची माहिती:
अद्याप फरार असलेल्या कृष्णा आंधळेवर 2020 ते 2024 या कालावधीत 6 गुन्हे नोंद आहेत, ज्यात तीन मारहाणीचे, एक खुनाच्या प्रयत्नाचा आणि एक खंडणीचा गुन्हा समाविष्ट आहे. सुधीर सांगळे याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी देशमुख हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
तपास सुरूच:
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लागू केल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा गुन्हेगारीच्या नेटवर्कचा अधिक सखोल तपास करत आहेत.