Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

नुकतेच रणपती शिवराय चित्रपटात चिन्मय मांडलेकर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार नसल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 08:08 PM
रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट!

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट!

Follow Us
Close
Follow Us:
  • रणपती शिवराय चित्रपटाची जोरदार चर्चा
  • अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार महाराजांची भूमिका
  • चिन्मय मांडलेकर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार नाही
मागील काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली. मात्र, या चित्रपटांची खरी लाट आली ती फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड चित्रपटांनंतर. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ मधील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज चित्रपटात चिन्मय मांडलेकरने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र, आता ‘शिवराज अष्टक’ मधील पाचव्या चित्रपटात म्हणेजच रणपती शिवराय चित्रपटात चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत दिसणार नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार महाराजांची भूमिका

रणपती शिवराय चित्रपटात शिवछत्रपतींच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. तसेच त्याला पाहून त्याचे चाहते देखील खूप खुश झाले. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत का दिसणार नाही?

चिन्मय आणि त्यांच्या कुटूंबाला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याचे कारण म्हणजे आपल्या मुलाचे ‘जहांगीर’ असे नाव ठेवल्यामुळे त्याच्या कुटुंबावरकाही युजर्सकडून टीका करण्यात आली. अनेकांनी मुघल सम्राटाच्या नावावरून मुलाचे नामकरण केल्याबद्दल चिन्मयवर निशाणा साधला.

सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर

यानंतर चिन्मयची पत्नी नेहा जोशी यांनी या नावामागील कारण स्पष्ट केले. नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत भूमिका मांडली. या व्हिडीओमध्ये नेहाने सांगितले की, त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर’ ठेवण्यामागचा अर्थ जग जिंकणारा’ असा आहे. याशिवाय तिने प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे उदाहरणही दिले.

दरम्यान, अभिनेता चिन्मय मांडलेकरने यांनीही एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली. मुलाच्या नावावरून आपल्या संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचे त्याने सांगितले. तसेच आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या सर्व घडामोडींनंतर चिन्मयने मोठा निर्णय घेतला. ज्यात त्याने येणाऱ्या सिक्वेल्समध्ये शिवाजी महाराजांची भूमिका आपण पुढे साकारणार नाही, असे जाहीर केले आहे.

 

Web Title: Why chinmay mandlekar is not doing role of chhatrpati shivaji maharaj in marathi movie ranpati shivray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • marathi entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री
1

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहा धमाकेदार चित्रपट, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला ‘कैरी’ अल्ट्रा झकास OTTवर लवकरच
2

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहा धमाकेदार चित्रपट, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला ‘कैरी’ अल्ट्रा झकास OTTवर लवकरच

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
4

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.