
संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार कोणी केले?
संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात संभाजी महाराज यांना धोकाधडीने पकडण्यात आले. यावेळी स्वराज्याचे सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे आणि अन्य मावळे धारातीर्थी पडले. विचार करा, ज्या राजाला ८ वर्ष लाखोंचे सैन्य पकडू शकले नाही. त्यांना आपल्याच गद्दारांनी पकडून दिले. पुढे जे झालं ते आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच.
महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी
अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची नजरानजर झाली. यावेळी राजांचे मित्र कविकलश देखील होते. अखेर फर्मान निघाला, शंभूराजांच्या डोळ्यात जळत्या सळई फिरवून त्यांना नवीन दृष्टी देण्यात यावी आणि इथूनच पुढे राजे आणि कविकलशांच्या अमानवी अत्याचाराला सुरुवात झाली. शेवटी, ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराज व कवीकलश यांना ठार मारण्यात आले. तसेच, संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते भीमा नदीत टाकण्यात आले.
भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या तुळापूर नावाच्या गावात संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे नदी किनारी फेकण्यात आले. “जर कोणी या शरीराच्या तुकड्यांना हात लावेल तर त्यालाही ठार करण्यात येईल.” अशी तंबी औरंगजेबाच्या सरदारांनी तुळापूरच्या लोकांना दिली. संपूर्ण, गाव मोठ्या दहशतीत वावरत होतं. आपला राजाचा असा दुर्दैवी अंत पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. मात्र, राजांचा अंतिम संस्कार करावा तरी कुठे हा प्रश्न होता?
अखेर, शंभूराजांवर प्रेम करणारे शूरवीर गोविंद महार पुढे सरसावले. त्यांनी आणि तुळापूरच्या लोकांनी राजांचे शरीर शिवले. गोविंद महार यांनी स्वतःच्या जमिनीवर राजांचे अंत्यसंस्कार केले. हीच जागा म्हणजे आजचे वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की गोविंद महार यांना संभाजी महाराजांच्या समाधीची जागा सांभाळण्याचा अधिकार शाहू महाराजांनी दिला होता. तुळापूर येथे आपल्याला गोविंद महारांची देखील समाधी पाहायला मिळते.
काही स्थानिक आणि मराठा समाजातील व्यक्तींचा दावा आहे की, बापूजी शिवले यांनी अंत्यसंस्कार केले होते, आणि शिर्के आडनावाच्या लोकांनी राजांचे शरीराचे तुकडे त्यामुळे त्यांना शिवले पाटील असेही म्हटले जाते.
महत्वाची सूचना: सदर लेख हा अन्य माहिती आणि लेखांच्या आधारे लिहिला गेला आहे. वरील मजकुरात दिलेल्या माहितीची नवराष्ट्र पुष्टी करत नाही.