Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Police ASI Death: नवी मुंबई पोलीस दलात खळबळ! वरिष्ठांची नावं घेत ASIने उचललं टोकाचं पाऊल

Navi Mumbai Police ASI Death: नवी मुंबई पोलीस दलातील ५६ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पांडुरंग निंबा पाटील यांचा महापे येथील एका लॉजमध्ये मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पाटील हे नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 04:25 PM
Navi Mumbai Police ASI Death: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navi Mumbai Police ASI Death: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ASI पांडुरंग पाटील यांचा महापे येथील लॉजमध्ये मृत्यू
  • मृत्यूपूर्वी दोन व्हिडीओ केल्याचे समोर
  • व्हिडीओमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
 

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. पोलीस दलातच काम करणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली असून ही घटना महापे येथील एका लॉजवर घडली आहे.

शनिवारी संध्याकाळी हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सगळीकडे त्यांचा शोध सुरू झाला. महापे येथील ‘साची लॉज’ मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉजच्या कर्मचाऱ्याने मृतदेह दिसताच त्याने पोलिसांना कळवलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. Navi Mumbai Police ASI Death:

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. पांडुरंग निंबा पाटील वय 56 वर्ष आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. नवीन मुंबईतील पोलिस दलामध्ये विशेष शाखेत काम करत होते. आत्महत्येपुर्वी त्यांनी दोन व्हिडिओ बनवले. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्याय मागितला आहे. त्यांनी व्हिडीओत एका माजी डीसीपी, एका एसीपी आणि एका हेड क्लार्कचे नाव घेतलं . या तिघांच्या जाचाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असं त्यांनी त्या व्हिडीओत म्हटलं आहे.

पहिल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले?

एका व्हिडीओमध्ये त्यांनी थेट नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्याय मागितला आहे. त्यांनी व्हिडीओत एका माजी डीसीपी, एका एसीपी आणि एका हेड क्लार्कचे नाव घेतलं . या तिघांच्या जाचाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असं त्यांनी त्या व्हिडीओत म्हटलं आहे.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या मुलींची आणि जवळच्या नातेवाईकांची माफी मागितली आहे. “मला माफ करा” असं म्हणत त्यांनी भावूक होऊन निरोप घेतला. हे व्हिडीओ बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती आहे.

शनिवारी संध्याकाळी हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सगळीकडे त्यांचा शोध सुरू झाला. महापे येथील ‘साची लॉज’ मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉजच्या कर्मचाऱ्याने मृतदेह दिसताच त्याने पोलिसांना कळवलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

पोलीस काय म्हणाले?

या घटनेवर सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संबंधित एएसआय यांनी आत्महत्या केली आहे हे खरं आहे. पण त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास आम्ही करत आहोत. त्यांना नेमका काय त्रास होता, कोणाचा जाच होता, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

“व्हिडीओमध्ये त्यांनी 8 पानी तक्रार अर्जाचा उल्लेख केला आहे, पण तो अर्ज अजून आमच्या हाती लागलेला नाही. त्यांची मोटारसायकल आम्ही ताब्यात घेतली आहे, त्यात काही संशयास्पद आढळलं नाही. त्यांच्या कारची चावी मिळाली आहे, आम्ही कारची पण झडती घेत आहोत. रविवार संध्याकाळपर्यंत आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

Kidnapping News: ‘मुलं पळवणारी टोळी’ आली म्हणताच पालकांची धावपळ; ४० सीसीटीव्हींनी उलगडले रहस्य!…

“पोलीस दलातील तणाव पुन्हा चर्चेतकर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलातील आतल्या वातावरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोलीस दलात कामाचा ताण खूप असतो, वरिष्ठांचा दबाव असतो, याची चर्चा नेहमीच होते. या घटनेमुळे तो विषय परत ऐरणीवर आला आहे.

UP Crime News: जन्माष्टमीच्या गर्दीत मुलीचे अपहरण; कुटुंबीय हादरले, तपासात गंभीर प्रकार उघड

पांडुरंग पाटील हे 56 वर्षांचे होते, म्हणजे त्यांची सेवा संपायला काहीच वर्षं बाकी होती. अशा वेळी त्यांनी असं पाऊल उचलावं, यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तो 8 पानी अर्ज सापडतो का, आणि व्हिडीओत नाव घेतलेल्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Sensation in navi mumbai police force asi takes drastic step after naming superiors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Navi Mumbai Crime
  • Navi mumbai News Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.