Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास

पुण्यात गुन्हेगारीचं स्वरूप बदलणाऱ्या सर्वात भयानक अध्यायांपैकी एक, शरद हिरामण मोहोळ. पिळदार मिशी, कपाळावर टिळा आणि पांढरे कपडे, या पोषाखाने तो सर्वांचे आकर्षण ठरत होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2025 | 12:22 PM
चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास

चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास

Follow Us
Close
Follow Us:
  • संदीपच्या खुनानंतर शरद मोहोळ टोळीचा उदय
  • गुन्हेगारी क्षेत्रात मोठं नाव कोरले
  • कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून
पुणे/अक्षय फाटक : टोळी युद्धाचे भयावह रूप अन् त्यातून पडणारे खून डोळ्यांनी पाहणारा चालक ते टोळीप्रमुख अन् पुढे ”हिंदू रक्षक” अशी ओळख निर्माण करणारा शरद मोहोळ. रक्ताळलेल्या दृश्यांनी पाहिलेले प्रसंग गुन्हेगारीच्या मार्गानं पुढे चालवून शरद मोहोळने गाडीचा चालक नव्हे, तर टोळी चालवणारा प्रमुख होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. कारागृहात असताना एका दहशतवाद्याचा निर्घृण खून करून त्यानं राज्यभराचं लक्ष वेधलं. आणि त्या क्षणापासून क्रूरता, हिंदुत्वाचा आवेश आणि रस्त्यावरच्या दहशतीचं मिश्रण त्याची ओळख ठरली. पुढे गुन्हेगार नव्हे, “हिंदू रक्षक” म्हणून नाव कमावत शरद मोहोळचं साम्राज्य उभं राहिलं, पुण्यात गुन्हेगारीचं स्वरूप बदलणाऱ्या सर्वात भयानक अध्यायांपैकी एक, शरद हिरामण मोहोळ.

शरद मुळचा मुळशी तालुक्यातील. संदीप मोहोळ याच्याच गावचा. त्याचा गाडी चालक. कोथरूडच्या सुतारदरा भागातच तो लहानचा मोठा झाला. शिक्षण नसलं तरी पैलवानकी व शरिरयष्टीकडे मात्र कटाक्षाने लक्ष देण्याच वेड असणारा हा मुलगा. पुढे गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या झाला. तो इतका नावजला की, त्याची राज्यभरात ओळख निर्माण झाली. पिळदार मिशी, कपाळावर टिळा आणि पांढरे कपडे, या पोषाखाने तो सर्वांचे आकर्षण ठरत होता.

शरद मोहोळ टोळीचा उदय

संदीप मोहोळच्या उदयापासून शरद मोहोळ त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे शरद मोहोळ याला गुन्हेगार, टोळीतील वाद व दुश्मनीची माहिती होती. त्या दोघांत चांगले सौख्य होते. ते भाऊबंदही होते. पण, २००६ मध्ये शरद मोहोळचा खून झाल्यानंतर बाबा बोडके टोळीपेक्षाही मोठा हादरा हा शरद मोहोळ व त्याच्या जवळच्या मुलांना बसला. तेव्हाच त्यांनी शरद मोहोळ खूनाचा बदला घेण्याचा कट रचला. दुसरीकडे मारणे टोळीकडून सातत्याने शरद मोहोळ व इतर मुलांना त्रास दिला जात होता. यामुळे गणेश मारणे टोळी चालविणारा किशोर मारणेचा दत्तवाडी परिसरात २०१० मध्ये गोळ्या झाडून खून केला. या खूनानंतर शरद मोहोळ टोळी उजेडात आली. अल्पावधीतच या टोळीने पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात नाव कोरले. दहशत निर्माण केली.

दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण

किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ कारागृहातून जामीनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मोहोळ टोळीने २०११ मध्ये दासवे सरपंचाचे ४० लाख रूपयांसाठी अपहरण केले होते. या अपहरण प्रकरणात गुन्हा नोंद झाला. त्यांनी सरपंचाचे अपहरण केल्यानंतर त्यांना कर्वेनगर भागात आणून खंडणी उकळली होती.

मोठा शस्त्रसाठा आणला पण कट उधळला

संदीप मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख गणेश मारणे याचा खून करण्याचा शरद मोहोळ टोळीचा कट होता. त्यासाठी टोळीने परराज्यातून मोठा शस्त्रसाठा आणला होता. दहा पिस्तूले आणि ८२ काडतूसे होती. गणेश मारणे न्यायालयात किंवा रुग्णालय याठिकाणी आल्यानंतर त्याला ठार मारण्याचा कट होता. पण, त्यापुर्वीच हा कट खडकी परिसरातून पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आणि हा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणात पुन्हा टोळीला अटक झाली.

कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून

पौड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सरपंचाच्या अपहरणप्रकरणात शरद मोहोळ तसेच आलोक भालेराव येरवडा कारागृहात होते. त्यांना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेले होते. त्याचठिकाणी बाँम्बस्फोटातील आरोपी व दहशतवादी कातिल सिद्धीकी हा देखील होता. तेव्हा कातिल याचे मोहोळ आणि भालेराव याच्याशी वाद झाले. या वादानंतर दोघांनी कातिल सिद्धीकाचा नाडीने गळा आ‌वळून खून केला होता.

कारागृहात असताना सरपंच

कारागृहातील आंतकवादी कातिल सिद्धीकाचा खून तसेच अपहरणप्रकरणात कारागृहात असताना देखील शरद मोहोळ हा मुठा गावचा सरपंच झाला होता. बिनविरोध सरपंच म्हणून त्याची निवड झाली होती. साधारण २०१० ते २०२१ या कालावधीत शरद मोहोळ कारागृहात होता.

सामाजिक कार्यात सहभाग

शरद मोहोळ २०२१ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने समाजिक कार्य सुरू केले. कातिल सिद्धीकाचा खूनानंतर तो एक हिंदू डॉन म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. नंतर गुन्हेगारीपासून लांब होत संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केले. खडक भागात त्याने पतित पावन संघटनेच्या बोर्डाचे पुर्व परवानगी न घेता उद्घाटन केल्याने खडक पोलिसांत गुन्हा देखील नंतर दाखल करण्यात आला होता. पण, तेव्हापासून खऱ्या अर्थाने तो हिंदू डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला.

विठ्ठल शेलारशी वादविवाद

गुन्हेगारीपासून लांब झालेला शरद मोहोळचे मुळशीतील विठ्ठल शेलार याच्याशी वादविवाद होऊ लागले होते. विठ्ठल शेलार पौड तसेच मुळशीत जमीन विक्री करत होता. त्यातून या दोघांचे वादविवाद झाले. त्यांच्यात दुश्मनी देखील झाली. २०२२ मध्ये एका प्रकरणात वाद झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांत शरद मोहोळ व इतरांवर गुन्हा देखील झाला होता.

शरद मोहोळचा खून

शरद मोहोळचे प्रस्थ वाढत होते. पुण्यात समाजकारणात नाव कमवले. हिंदू रक्षक म्हणून देखील तो नावारूपाला आला. त्यात गुन्हेगारीपासून लांब झाल्याने तसेच सामाजिक कार्यात असल्याने मुलांची गरज भासत होती. त्यातच मुन्ना पोळेकर हा तरूण त्याच्याज‌वळ आला. शरद मोहोळसोबतच मुन्ना कायम राहत होता. त्याच्या घरी देखील असत. त्याच्याच घरी जेवण देखील करत होता. पण, दुसरीकडे पुर्वापारची गुन्हेगारीपाठ, त्यासोबतच विठ्ठल शेलार याच्याशी असलेले वाद, गणेश मारणेशी पुर्व वाद या एकत्रित कारणांनी २०२४ मध्ये मुन्ना पोळेकर व इतरांनी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला.

शरद मोहोळच्या खूनाचा बदला

शरद मोहोळच्या खूनानंतर टोळी संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले. पण, पोलिसांच्या एका कारवाईनंतर ते फेल ठरले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही महिन्यांपुर्वी तरुणांना पिस्तूलांसह अटक केली. तेव्हा त्यांच्या चौकशीतून शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल आणले गेल्याचे समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे. त्यांच्या निशान्यावर असलेल्या व्यक्तींची नावे देखील पोलिसांना मिळाली आहेत.

Web Title: Sharad mohol who died in a shooting committed many crimes in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Sharad Mohol

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
1

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…
2

रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…

Crime News: पुणे पोलिस थेट मध्यप्रदेशमध्ये घुसले अन् धोकादायक शस्त्रास्त्र..; तीन डझन आरोपी ताब्यात
3

Crime News: पुणे पोलिस थेट मध्यप्रदेशमध्ये घुसले अन् धोकादायक शस्त्रास्त्र..; तीन डझन आरोपी ताब्यात

हडपसरच्या टिपू पठाण टोळीला दणका; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
4

हडपसरच्या टिपू पठाण टोळीला दणका; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.