खेडमध्ये पर्यटकाला मारहाण (फोटो- istockphoto)
अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण
मुंबई-गोवा महमार्गवारील घटना
खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी येथे एका हटिलच्या पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चारचाकी गाडीला धड़क दिल्यानंतर, जाब विचारणाऱ्या पुण्याच्या एका ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीस्वाराने चक्क कानाखाली मारून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील धनकवडी येथील रहिवासी महादेव अनंतराव टिंगरे (५२) हे लोटे एम.आय.डी.सी. मधील काम संपवून आपल्या होंडा सिटी कारने (एमएच १२एकी७६६२) जेवणासाठी धामणदेवी येथील ‘ओमेगा इन’ हॉटेलमध्ये जात होते.
ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना, पाठीमागून येणाऱ्या कावासाकी वर्सेस १००० या स्पोर्ट्स बाईकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार अजय शर्मा (३०, रा. कामोठे, पनवेल) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात इसला. याप्रकरणी महादेव टिंगरेंनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपी अजयच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, ११५(२) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
१० लाखांच्या हुंड्यासाठी छळ
बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तिचा नवरा तिला कधी बाथरूममध्ये कोंडायचा, तर कधी तिला बेदम मारहाण करत होता. या १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही संतापजनक घटना बंगळुरूच्या तुमकूर जिल्ह्यातील येदियुमध्ये घडली.
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कीर्ती श्री असे आहे. कीर्ती तुमकूरमधील मधुगिरी तालुक्यातील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचं लग्न गुरुप्रसाद याच्याशी झालं होतं. लग्नाला सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाला झाला होता. यात ४०० ग्रॅम सोनं आणि ५ लाख रुपये रोख रक्कम माहेरच्यांनी दिली होती. एवढं सगळं देऊनही कीर्ती श्रीचा पती गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पैशांसाठी तिला त्रास देत होते.






