कारण काय?
पोलीस सूत्रानुसार, ही घटना शनिवारी बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकर ट्रेनमध्ये घडली. दोन महिला फुटबोर्डजवळ उभ्या होत्या, त्यांच्या मागे एनएम कॉलेजचे व्याख्याते आलोक कुमार सिंग आणि एक सहकारी प्राध्यापक होते. आरोपी ओंकार शिंदे हा त्यांच्या मागे उभा होता. चौकशीदरम्यान, शिंदेने दावा केला की तो पुढे जाण्याच्या प्रयत्न करता असताना अलोक सिंगने त्याला ढकलले आणि म्हणाला, तुम्हाला “तुम्हाला दिसत नाही का, पुढे महिला उभ्या आहेत?” यावर दोन्ही महिला मागे वळल्या. त्यावेळी त्याला महिलांसमोर अपमान झाला असे वाटले. यामुळे तो संतापला.
रागाच्या भरात शिंदेला आठवले की त्याच्या बॅगेत एक चिमटा आहे, जो तो दागिने बनवण्यासाठी वापरतो. त्याने त्याच चिमट्याने प्राध्यापकावर भोकसले. आरोपीचा हेतू त्यांना मारण्याचा नव्हता, तर तो फक्त त्याला धडा शिकवण्यासाठी चिमट्याने टोचण्याचा आणि नंतर पळून जाण्याचा विचार करत होता. असे त्याने सांगितले. मात्र तो वार इतका गंभीर ठरला की आलोक कुमार सिंग यांचा मृत्यु झाला.
त्याला प्राध्यापकाची मृत्यूची माहिती नव्हती जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याला समजले. असाही आरोपीचा दावा आहे. सध्या पोलीस आरोपीच्या जबाबची चौकशी करत आहेत. त्याच्या वडिलांनी पोलिसांना असेही सांगितले की त्याच्या मुलाला त्याचा राग नियंत्रित करणे कठीण जात आहे. आरोपी ओंकार शिंदे हा रागीट स्वभावाचा आहे असे त्यांनी सांगितले.
आता आरोपीने केलेल्या या दाव्याने या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आता त्याच्यावर काय कारवाई करण्यात येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला
Ans: मुंबईच्या मालाड स्टेशनवर, लोकल ट्रेनमधून उतरताना.
Ans: महिलांसमोर ढकलून अपमान केल्याने राग आल्याचा दावा आरोपीने केला.
Ans: दागिने बनवण्यासाठी वापरला जाणारा चिमटा (धारदार साधन).






