Satish Bhosale: सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमके प्रकरण काय?
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला आज पोलिस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पाठवली आहे. शिरूर येथील पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. त्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
असा सापडला सतीश भोसले?
सतीश भोसलेला अटक केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा खोक्या भोसले फरार होता. पोलिसांची पथकेही त्याचा शोध घेत होते. आम्हाला सतीश भोसलेचे शेवटचे लोकशन प्रयागराज याठिकाणी दिसले. त्यांनंतर उत्तर प्रदेश आणि प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचून सतीश भोसलेला अखेर ताब्यात घेतले.
Satish Bhosale Arrested : सतीश उर्फ खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक
सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब आहे, अस म्हणत सुरेश धस म्हणाले की, मी कुठेही कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरेवालेच माझ्या मागे असायचे, त्यामुळे कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावे, हे मी ठरवणार नाही. धनंजय मुंडे दवाखान्यात असल्याने मी त्यांना भेटायला गेलो होतो. हे खरं आहे. दुसरी गोष्ट अशी की, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना हे प्रकरण तेवत का ठेवलं, असं विचारलं. संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख होत. त्यामुळे मी हे प्रकऱण तेवत ठेवलं. जोपर्यंत त्यांच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मी प्रकरण तेवत ठेवणार.
Satish Bhosale Arrest: शेवटचं लोकेशन अन् …; असा सापडला सतीश भोसले?
सुरेश धस म्हणाले की, ‘ सतीश भोसले प्रयागराजला मिळाल की आणखी कुठे मिळाला ते पोलिस पाहून घेतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे काहीही करू शकतो. तो अजून फरार आहे. तोही सापडेल.सतीश भोसले प्रकरणात सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे. अजय मुंडे लहान आहेत, लहान मुलांबाबत मी काही बोलणार नाही. धनंजय मुंडेंना माझं म्हणण आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा तुम्ही बोला मग मी उत्तर देईन.विजय वडेट्टीवार म्हणतात खोका पण सापडला पाहिजे, असा प्रश्न विचारला असता, खोका, बोका, आणि त्याचा आकापण सापडला पाहिजे. पोलिसांनी चौकशी करावी, जेजे सापडतील त्या सर्वांना तुरुंगात टाकावं.