crime (फोटो सौजन्य: social media )
रत्नागिरी शहरालगतच्या शांतीनगर परिसरात एक धक्कदायक घटना घडली. पोटच्या पोराने आधी आपल्या आईची गाला चिरून हत्या केली. त्यांनतर स्वतः हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. अनिकेत शशिकांत तेली (25) असे हत्या करण्याऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या नाचणे गावातील सुपल वाडी येथे पूजा तेली आणि त्यांचा मुलगा अनिकेत राहत होते. अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा एकटेच राहत होते. आज सकाळी अनिकेतने अज्ञात कारणातून आईच्या गळ्यावर वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली.
नस कापल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला अनिकेत घराबाहेर येऊन बसला, तेव्हा शेजाऱ्यांनी ही घटना पहिली आणि पोलिसांनी माहिती दिली. अनिकेतच्या शेजारीच त्याचे काका राहतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा सुरु केला. पूजा तेली यांचे शव घरातच असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
का केली आईची हत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न?
प्राथमिक माहितीनुसार, परिसरातील लोकांमध्ये चर्चा आहे की, शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या कर्जामुळे ही घटना घडली असावी. मात्र, याबद्दल पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अनिकेतला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे.
गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल
मुंबईत एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी मुलीला हे अश्लील व्हिडीओ फोटो दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जबरदस्ती करत होता. गोरेगावच्या रॉयल पॉम व्हिला, आरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या पार्टीत आरोपीने हे पार्टीत आरोपीने हे कृत्य केल्याचे मुलीने तक्रारीत म्हंटले आहे.
Karnatak Crime: विवाहित प्रेयसीच्या तोंडात टाकले ज्वलनशील पदार्थ, नंतर केली निर्घृण हत्या