crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला जिला मृत घोषित करण्यात आले होते. ती कळव्यात जिवंत सापडली आहे. या महिलेचे नाव मनीषा सराटे असे आहे. मनीषा ही कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असून ती गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे. तिच्या कुटुंबियांना तिचा मृत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तिथे पोलिसांची मदत घेण्यात आली. तेव्हा तपासात ती जिवंत असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मनीषा सराटे हीचा एक फोटो २४ सप्टेंबर रोजी तिच्या बहिणीच्या व्हॉट्सॲपवर दिसला. या फोटोत मनीषा मृत अवस्थेत दिसत होती. हा फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंबात खळबळ माजली आहे. कारण मनीषाचा शोध तिचे कुटुंबीय गेल्या ३ महिने घेत होते. फोटो मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब विक्रोळी पोलीस ठाण्यात पोहोचेल आणि तक्रार नोंदवली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून तपास सुरु केला. तपासादरम्यान मनीषा जिवंत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे ती एका तरुणासोबत राहत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी बरीच मेहनत घेतल्यांनंतर त्या दोघांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले. मनिषाने स्वतःच्या मृत्यूची बातमी का पसरवली, तो फोटो तिच्या बहिणीलाच कसा मिळाला या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
चौकशीनंतर मनीषाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. मनीषा सोबत असलेल्या त्या तरुणाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आले नाही आहे. यात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचंही पोलीस सुत्रांकडून समजत आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मोठमोठे दिग्गज व सुप्रसिद्ध अभिनेत्यांना बोलवण्यात आले. याच जनजागृती सोबत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरू केला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कमी किमती पासून ते लाखो करोड रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. यामध्ये परदेशी आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 103 आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यातील 96 जणांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
सन 2023 ते 2025 या एक वर्षात नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करून, तब्बल 1 हजार 613 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 2 हजार 754 आरोपींना अटक करण्यात आली असून, 26 कोटी 84 लाख रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. जप्त केलेले अमली पदार्थ उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांच्या समोर तळोजा एमआयडीसीतील बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहेत.