crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. IIT बॉम्बेच्या हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट ) मध्यरात्री घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पवईत आयआयटी बॉम्बे मध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणानं नैराश्यातून होस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षणाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरा होस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप विद्यार्थ्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही आहे. आत्महत्येचं कारण स्पष्ट होण्यासाठी त्याचा मोबाईल, त्याची रूम तपासण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
मालेगावात तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून; तोंडावर, मानेवर केले सपासप वार
पूर्ववैमनस्यातून कुरापत काढून तिघा जणांनी मनपा कंत्राटी कर्मचारी असलेल्या नितीन उर्फ रितीक अर्जुन निकम (वय २५, रा. जयभीमनगर, आयशानगर) याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. लाकडी दांडक्याने व चाकूने हल्ला करून तसेच चेहरा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री जुना आग्रारोडवरील एका शोरूमजवळ घडली.
याप्रकरणी छावणी पोलिसांनी संशयित आरोपी सचिन अहिरे उर्फ सच्या माया याला अवघ्या काही तासात अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ विशाल अर्जुन निकम यांनी फिर्याद दिली आहे. विशालचा भाऊ नितीन याला सचिन अहिरे व अन्य अल्पवयीन संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारदार चाकूने गंभीर वार केले.
तसेच चेहऱ्यावर दगड टाकून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या खुनाची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
मानवत हत्या प्रकरणातील आरोपीचा सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या? शोध सुरू