Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा घाला; चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी जात असताना डोंबिवलीतील सोहम कात्रे चालत्या लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडला. गर्दीमुळे तोल गेल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 11:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोहम कात्रे बारावीचा पेपर देण्यासाठी कळवा येथे जात होता.
  • कळवा-मुंब्रा दरम्यान चालत्या लोकलमधून पडला.
  • गर्दीमुळे तोल जाऊन अपघात झाल्याची माहिती.
मुंबई: बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी एका विद्यार्थ्यांचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बारावीचे बोर्डाचे पेपर १० फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. वेगवेगळ्या केंद्रावर होत आहे. हीच परीक्षा देण्यासाठी मृत विध्यार्थी जात होता. मात्र लोकलमध्ये प्रवास करतांना पडून त्याचा मृत्यू झाला.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या विद्यार्थीच नाव सोहम कात्रे असे आहे. तो बारावी बोर्डाचा पहिला पेपर देण्यासाठी कळवा येथील मनीषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जात होता. लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सोहमचा तोल गेला. कळवा आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांदरम्यान तो चालत्या लोकल ट्रेनमधून पडला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं परिसर हादरून गेलं आहे.

Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत सोहमच्या अपघाताची लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. नंतर तातडीने नागरिकांच्या मदतीनं त्याला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी 10:30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

सोहमचा मृत्यू झाल्याचे समजताच सोहमच्या पालकांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची रेल्वे प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यायली हवी, अशी मागणी सोहमच्या कुटुंबियांनी केली आहे. सोहमचं शाळा प्रशासन देखील रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासावर उपाययोजना कराव्यात, असं पत्र देणार आहेत. या घटनेने पुन्हा एकदा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

मुंबईच्या गोवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव शिफा असे आहे. पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणींसह २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली.

Mumbai Crime: संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कधी घडला?

    Ans: 10 फेब्रुवारीच्या सकाळी, बोर्डाच्या पहिल्या पेपरच्या दिवशी.

  • Que: मृत विद्यार्थी कोण होता?

    Ans: डोंबिवलीतील सोहम कात्रे.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन पडणे.

Web Title: Mumbai on the day of the first paper of class xii a student dies after falling from a moving local train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
1

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
2

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त
3

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

Virar–Churchgate local चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याचा धक्कादायक प्रकार; बाटली ट्रॅकवर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
4

Virar–Churchgate local चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याचा धक्कादायक प्रकार; बाटली ट्रॅकवर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.