Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमधील आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’? ८ तरुणींवर अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न

या कंपनीत जवळपास २०० कर्मचारी काम करतात. सर्व पीडिता पदवीधर, उच्च पदवीधर असून, त्यांना फारतर १८ ते २२ हजार रुपयापर्यंत वेतन मिळते. या घटनेतील एका युवतीने एचआरकडे लेखी तक्रार केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 09, 2026 | 10:28 AM
नाशिकमधील आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’? ८ तरुणींवर अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
Follow Us
Follow Us:

Nashik News: एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार तिच्यासह एका तरुणाचे बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना इंदिरानगर परिसरातील आयटी पार्कमधील कंपनीत झाली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांसह कंपनीच्या एचआर असलेल्या महिलेलाही आरोपी केले असून, राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच अशा प्रकारे एका बहुराष्ट्रीय कंपनीतील गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

याप्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिसांत आठ व देवळाली कॅम्प पोलिसांत एक असे नऊ गुन्हे याप्रकरणी दाखल आहेत. घटनेचे गांभीय लक्षात घेता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. एका धर्मातील सातपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Nashik Crime: खाकी वर्दीचा बनाव, AI चा वापर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलांची फसवणूक; आरोपी गजाआड

पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख आणि निदा खान अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी निदा हिचा शोध सुरू आहे. एका पीडितेची अत्याचार व धर्मांतरणाच्या प्रयत्नाची तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंदवून ‘एसआयटी’ स्थापन झाली, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत संशयितांना ताब्यात घेत पीडितांना विश्वासात घेतले. त्यानुसार आतापर्यंत नऊ गुन्हे नोंद असून, आणखी पीडिता समोर येण्याची शक्यता आहे.

‘धर्मसंस्कृती’ रुजविण्याचा प्रयत्न

संशयित आठवड्यातून एकदा विशिष्ट प्रकारचे अत्तर लावून कार्यालयात यायचे. धार्मिक पारंपरिक पठाणी कपडे परिधान करून डोळ्यांत सुरमा भरून एका विशिष्ट बोलीभाषेचा वापर करून सर्वांशी संवाद साधायचे. त्यातून काही पीडिताना धर्मावरून शेरेबाजी करीत स्वतःची धर्मसंस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपासात पीडितांच्या जबाबातून समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ! इराणमधील युद्धविरामानंतर Gautam Adani ना लॉटरी, एका दिवसात कमावले तब्बल

बारा जणांची ‘एसआयटी’
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्पचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबई नाक्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे, जितेंद्र वाघ, उमेश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास माळी, किरण शेवाळे, मिताली कोळी, अंमलदार संदीप बागल या बारा जणांची एसआयटी नेमण्यात आले आहे.

कंपनीत दोनशे कर्मचारी कामाला

या कंपनीत जवळपास २०० कर्मचारी काम करतात. सर्व पीडिता पदवीधर, उच्च पदवीधर असून, त्यांना फारतर १८ ते २२ हजार रुपयापर्यंत वेतन मिळते. या घटनेतील एका युवतीने एचआरकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, खासगी कंपनीत असे प्रकार घडतात, असे सांगत महिला एचआरने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, यामुळे आरोपीचे धाडस वाढले. तसेब कॉर्पोरेट असलेल्या या कंपन्यामधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी विशाखा प्रमाणे एखादी समिती कार्यरत होती का नव्हती, हा सुद्धा प्रश्न अनुतींण आहे.

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती
कॉर्पोरेट क्षेत्रात पहिलाच गुन्हा

कॉर्पोरेट कंपन्यामध्ये शोषण होण्याच्या तक्रारी येत असतात, बड्या उद्योगाशी जोडलेल्या कंपनीत असा अक्षम्य प्रकार घडणे आणि या प्रकरणात कंपनीत टीम लिडर म्हणून काम करणाऱ्या संशयितांचा समावेश असणे, हा प्रकार क्वचितच समोर आला असावा. विशेष म्हणजे पोलिसांनी तर यापुढे जात व्यवस्थापनातील महत्वाचा भाग असलेल्या पुणे येथील एचआर महिलेविरोधात गुन्हा दाखल केल्याने हा एक ऐतिहासिक गुन्हा ठरला आहे.

कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. हे गुन्हे बलात्कार, विनयभंग तसेच धर्मातरणांशी संबंधित आहे. आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.-  संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, तपासधिकारी

आर्थिक शोषण; भाबडेपणाचा गैरफायदा

एक पीडिता कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण पूर्ण होताच नोकरीला लागली, तिला अठरा हजार रुपये वेतन मिळत असून, त्यापैकी दहा हजार रुपये तिच्या बहिणीच्या शिक्षणासाठी दरमहा राखून ठेवत आहे. उर्वरित आठ हजारांत घरखर्च करणाऱ्या पीडितेकडून संशयिताने दरमहा दोन-तीन हजार उकळले आहेत. या आर्थिक शोषणाबाबतही पोलिसांनी तपास केला असून, बँकेतील व्यवहारांची माहिती संकलित केली आहे. सातारा येथून कामानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या तरुणाच्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेत संशयितांनी त्याच्या धर्मातराचा प्रयत्न केला. पीडित तरुणाला वारंवार त्याच्या धर्माबाबत बोलून मुस्लिम धर्माचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पीडिताला भगव्या कुर्तावर मुस्लिम धर्मीय टोपी परिधान करण्यास लावून नमाज पठण करायला सांगितले. पीडिताला बळजबरीने मांसाहारही करायला लावल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

 

 

Web Title: Shocking religious conversion attempt in nashik mnc sit formed after 8 women allege harassment and forced conversion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Nashik Crime
  • Nashik Police
  • Religion Conversion

संबंधित बातम्या

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
1

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
2

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश
3

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.