धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; मासिक पाळीच्या काळातही जबरदस्ती केली अन्... (फोटो सौजन्य: iStock)
छत्रपती संभाजीनगर : सिन्नर तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी बलात्काराचे गंभीर कलम वाढवत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरोपी शरद आथरे (रा. उंबरखेड, ता. निफाड) हा पीडितेच्या घरी आला होता. त्याने चहामध्ये गुंगीचे औषध देऊन पीडितेवर पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मानसिक धक्क्यामुळे व सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार उघड केला नव्हता.
२४ मार्च रोजी न्यायालयात नोंदवलेल्या जबाबातही तिने संपूर्ण सत्य मांडले नव्हते. मात्र, ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून तिने दिलेल्या पुरवणी जबाबात संपूर्ण आपबीती सांगितली. आरोपीने तिच्या मासिक पाळीच्या काळातही जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचेही या वेळी उघड झाले.
आधी विनयभंगाचा गुन्हा नंतर अत्याचार
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली. सुरुवातीला दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पीडितेच्या पुरवणी जबाबानंतर बलात्कारासह इतर गंभीर कलमे वाढवण्यात आली असून, पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.
अल्पवयीन मुलावर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.
शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस






