Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagavane case: आत्महत्या नव्हे, हुंडाबळीच…; वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक अहवाल सादर

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी महिला व बालक हक्क आणि कल्याण समितीने तपास अहवाल तयार केला असून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 20, 2025 | 03:11 PM
Vaishnavi Hagavane case: आत्महत्या नव्हे, हुंडाबळीच…; वैष्णवी हगवणे  प्रकरणात धक्कादायक अहवाल सादर
Follow Us
Close
Follow Us:

Vaishnavi Hagavane case:  दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीच्या पतीसह सासू, सासरे, नणंद आणि दीर अशा पाच जणांना अटक करण्याती आली. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात असून, पोलिस या प्रकरणाचा तपास वेगाने करत आहेत.

या प्रकरणात आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. महिला व बालकल्याण समितीने या आत्महत्येप्रकरणी आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात वैष्णवी हगवणे हिने केलेली आत्महत्या ही प्रत्यक्षात हुंडाबळी असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानंतर या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

India vs England 4th Test : गौतम गंभीरच्या कोचिंगवर भज्जी नाराज! हरभजन सिंगने केली मोठी मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, महिला व बालकल्याण समितीने दिलेल्या अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवीने सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळेच आत्महत्या केल्याचे निष्पण्ण झाले आहे. इककेच नव्हे तर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे पोलिस अधिकारीजालिंदर सुपेकर यांचीदेखील चौकशी करण्याचे आणि त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची शिफारस अहवालामध्ये करण्यात आली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी महिला व बालक हक्क आणि कल्याण समितीने तपास अहवाल तयार केला असून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्षपद भाजप आमदार मोनिका राजळे यांच्याकडे आहे. या अहवालात वैष्णवीच्या मृत्यूच्या अनुषंगाने राज्यातील महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळीप्रकरणांची चौकशी करण्यात आली. अहवालात वैष्णवीची आत्महत्या ही हुंडाबळी असल्याचं ठामपणे नमूद करण्यात आलं आहे.

महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या

विशेष म्हणजे, वैष्णवीची जाऊबाई मयूरी हगवणे हिने वेळेवर या प्रकरणाची दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, असं निरीक्षणही या समितीने नोंदवलं आहे. तसेच, मयूरीने दिलेली तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही अहवालामध्ये स्पष्टपणे करण्यात आली आहे.हा अहवाल पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

याशिवाय या समितीला या प्रकरणात आणखीही काही माहिती मिळाली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची चौकशी करताना
वैष्णवी हगवणेला हुंड्याच्या माध्यमातून हगवणे कुटुंबीयांनी ब्रॅण्डेड कार, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि पैसे घेतल होते, त्याचे पुरावेदेखील या समितीने मिळवले आहेत. वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानुष मारहाण, छळ झाल्याचेही समोर आले आहे. हे प्रकरण पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीचे असल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे. यासोबतच जालिंदर सुपेकर यांचीदेखील चौकशी करून या प्रकरणात त्यांचाही त्यांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करण्यात यवे. जालिंदर सुपेकरांच्या बायकोच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे आढळून आल्याने तिला या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे. तसेच प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.

 

Web Title: Shocking report submitted in vaishnavi hagavane case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • crime news marathi
  • pune crime news
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट
1

Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद
2

Pune Crime: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी
3

Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी

Pune crime news : एक कार चोर असाही! दुरस्तीसाठी दिलेल्या मोटारीसह गॅरेज चालकाचा पोबारा; गुन्हा दाखल  
4

Pune crime news : एक कार चोर असाही! दुरस्तीसाठी दिलेल्या मोटारीसह गॅरेज चालकाचा पोबारा; गुन्हा दाखल  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.